जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी…यांची निवड !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा


शिर्डी (प्रतिनिधी)


    भारतीय जनता पार्टी उत्तर नगर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नितिन दिनकर यांची निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

   

नितिन दिनकर हे नेवासा येथील रहिवासी असून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,बजरंग दल,विश्व हिंदू परिषद या माध्यमातून एक कट्टर हिंदुत्ववादी नेता अशी प्रतिमा निर्माण केली आहे.त्यामुळे या पदावर त्यांची निवड करण्यात आली आहे.

  भारतीय जनता पार्टी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे हे शिवसेनेत गेल्यामुळे त्यांच्या जागी रिक्त झालेल्या पदावर नेवासा तालुक्यातील नितीन दिनकर यांची निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.नितिन दिनकर हे नेवासा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,बजरंग दल,विश्व हिंदू परिषद या माध्यमातून एक कट्टर हिंदुत्ववादी नेता अशी त्यांची प्रतिमा आहे.त्यामुळे या पदावर त्यांची निवड करण्यात आली आहे.दिनकर यांनी यापूर्वी नेवासा तालुका अध्यक्ष,जिल्हा सरचिटणीस,श्रीरामपूर विधानसभा प्रमुख, प्रदेश प्रवक्ता,शिर्डी लोकसभा विस्तारक,शिर्डी लोकसभा संयोजक असे अनेक पदावर काम करून पदाला न्याय दिला असल्याचा दावा केला आहे.

       त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, विधानपरिषद सभापती राम शिंदे,माजी खा.सुजय विखे,माजी आ.वैभव पिचड,स्नेहलता कोल्हे,माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर,जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे,नितीन कापसे,बी.एस.एन.एल.चे संचालक रवींद्र बोरावके,युवा मोर्चा प्रदेश सचिव श्रीराज डेरे,सोशल मीडिया सेल जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष कांचन मांढरे,एस.सी.आघाडी जिल्हाध्यक्ष दिलीप त्रिभुवन,साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे,उपाध्यक्ष सचिन देसरडा,अशोक पवार,विनोद राक्षे,महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस शुभांगी सप्रे आदींनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close