जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

कृषी पशुसंवर्धन विभागाच्या केंद्रीय समितीच्या सदस्यपदी…या खासदारांची वर्णी

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  केंद्र शासनाच्या कृषी,पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया (२०२४-२५) स्थायी समितीसाठी
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा. भाऊसाहेब वाकचौरे यांना काम करण्याची संधी मिळाल्याने खा.वाकचौरे यांचे सर्व  स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

 “या केंद्रीय समितीच्या माध्यमातून अ.नगर जिल्ह्यात शेतकरी,दुग्ध व्यावसायिक अन्न प्रक्रिया उद्योग आणणे व समितीवर काम करणे मतदारसंघाच्या दृष्टीने फायद्याचे ठरावे व जास्तीत जास्त शेतकऱ्याची सेवा करण्याची संधी मिळेल”-खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी लोकसभा मतदार संघ.

  कृषी,पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीवर काम करीत असताना शेतकरी,दुग्धव्यावसायिक,यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन काम करणाऱ्या लोक प्रतिनिधीस संधी मिळाल्या बद्दल मतदार व कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. सदर समितीचे कामकाज हे  नियम 331C ते 331N च्या तरतुदींच्या अधीन चालत असते .समितीचे कामकाज श्री चरणजीत सिंग चानी यांचे अध्यक्षतेखाली चालणार असून समितीत एकूण ३१ सदस्य असून त्यात २१ लोकसभा सदस्य तर १० राज्यसभा सदस्य यांचा समावेश आहे.यात महाराष्ट्र राज्यातील ३ सदस्याचा समावेश आहे .


     या केंद्रीय समितीच्या माध्यमातून अ.नगर जिल्ह्यात शेतकरी,दुग्धव्यावसायिक अन्न प्रक्रिया  उद्योग आणणेकामी व  समितीवर काम करणे मतदारसंघाच्या दृष्टीने फायद्याचे  ठरावे व जास्तीत जास्त  शेतकऱ्याची सेवा करण्याची संधी मिळेल अशी प्रतिक्रिया खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली आहे.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close