निवड
…हा तरुण पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथील रहिवासी माजी तालुका शिक्षक स्व.पंढरीनाथ जोंधळे गुरुजी यांचे नातू व मिनानाथ जोंधळे यांचे कनिष्ठ चिरंजीव अभिषेक जोंधळे याने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा-२०२१ हि राज्यात ०९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण केली आहे.त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या परीक्षा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथील माजी तालुका शिक्षक स्व.पंढरीनाथ जोंधळे यांचे नातू व मिनानाथ जोंधळे यांचे कनिष्ठ चिरंजीव अभिषेक जोंधळे हा राज्यात नवव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.या पूर्वी त्यांचा पुत्र तहसीलदार या पदासाठी सागर जोंधळे हा हि परीक्षा उत्तीर्ण झाला होता.
अधिकारी होणे हे बहुतेकांचे स्वप्न असते.यासाठी बरेच जण त्या दिशेने प्रयत्न देखील करतात.याबाबतीत महाराष्ट्र राज्य इतर राज्यांच्या तुलनेत मागे पडले होते.मात्र अलीकडील काळात याबाबत चांगली जागृती झाल्याने महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत येणाऱ्या पीएसआय म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या परीक्षा मार्फत भरण्यात येत असते.महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा असे या परीक्षेचे नाव.सदर परीक्षा मार्फत हि पदे भरण्यात येत असतात.त्यासाठी हि परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते.सदर परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथील माजी तालुका शिक्षक स्व.पंढरीनाथ जोंधळे यांचे नातू व मिनानाथ जोंधळे यांचे कनिष्ठ चिरंजीव अभिषेक जोंधळे हा राज्यात नवव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
त्याच्या या यशाबद्दल खा.सदाशिव लोखंडे,जिल्हा प्रमुख कमलाकर कोते,शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते रतीलाल लोढा,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,जलसंपदाचे माजी उपअभियंता सुखदेव थोरात,जवळके ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वसंत थोरात,सरपंच सारिका विजय थोरात,माजी उपसरपंच अण्णासाहेब भोसले आदींनी अभिनंदन केले आहे.