जाहिरात-9423439946
निवड

उपसरपंचपदी थोरात यांची बिनविरोध निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

सिन्नर तालुक्यातील पंचाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनिल (महेश) साहेबराव थोरात यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे.त्यांचे निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

पंचाळे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची दीड वर्षांनी बिनविरोध निवड होत असते.यापूर्वी चे उपसरपंच दुलाजी सोपान थोरात यांनी त्यांच्या पदाचा आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेले उपसरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली होती त्यात सुनील थोरात यांची हि निवड झाली आहे.

  अकरा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या पंचाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाचे आवर्तन ठरलेले आहे.त्यानुसार दीड वर्षांनी एका सदस्याची उपसरपंचपदी बिनविरोध निवड होत असते.यापूर्वी चे उपसरपंच दुलाजी सोपान थोरात यांनी त्यांच्या पदाचा आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेले उपसरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली.त्यासाठी ग्रामसेवक प्रमोद शिरोळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले. यावेळी विहित वेळेमध्ये उपसरपंच पदासाठी सुनिल थोरात यांचा एकमेव अर्ज प्राप्त झालेल्याने या पदावर त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामसेवक शिरोळे यांनी जाहीर केले आहे.त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच सुनिल उर्फ महेश थोरात यांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

   यावेळी उपसरपंच निवडीच्या  निमित्ताने आयोजित ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीस सरपंच रंजना थोरात,अनिता थोरात,उषा थोरात,विठाबाई थोरात,सुमन थोरात,सिंधुबाई सैंद्रे,भारत वाघ,प्रकाश थोरात,दुलाजी थोरात,बाळू मोरे हे सदस्य उपस्थित होते.तसेच पोलीस पाटील नवनाथ थोरात,ग्रामस्थ रावसाहेब थोरात,बाळासाहेब थोरात,रामनाथ थोरात,जयराम थोरात,भीमाशंकर थोरात,छबु थोरात,सुनील थोरात,जालिंदर थोरात,कैलास थोरात, विवेक थोरात,सुधाकर राऊत,संतोष बेलोटे,संदीप थोरात,नारायण थोरात,लक्ष्मण थोरात,पोपट थोरात,अरुण थोरात,पंडित थोरात,नंदू थोरात,राजेंद्र थोरात,धनंजय थोरात,दिलीप थोरात,शांताराम आसळक,दिगंबर चव्हाण, हिरामण थोरात,गौरव थोरात,संजय थोरात,नंदू बेलोटे,विक्रम सैंद्रे,सीताराम फटांगरे,संजय दवंगे,गणेश तसेच चैतन्य युवाशक्ती फाउंडेशन चे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close