जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

युवा सेना तालुका प्रमुखपदी गोर्डे 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या नुकत्याच झालेल्या नियुक्तीत युवासेना कोपरगाव तालुका प्रमुख पदी विजय गोर्डे यांची नियुक्ती झाली आहे त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

युवा सेनेच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल निळवंडे कालवा कृती समितीचे जेष्ठ नेते आप्पासाहेब कोल्हे सत्कार करताना.

“बालपणापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना पक्षाची भूमिका व काम ग्रामीण भागात सामान्य जनतेपर्यंत नेऊन पोहचवण्याचे काम विजय गोर्डे यांनी केले आहे.त्यांच्या निष्ठेची हि पोच पावती आहे”-आप्पासाहेब कोल्हे,नेते निळवंडे कालवा कृती समिती,अ.नगर-नाशिक.


  आगामी एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणूक आणि त्या पाठोपाठ ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक यावर्षी संपन्न होत असल्याने शिवसेवा उद्धव गटासह सर्वच राजकीय पक्ष आपल्या पदाधिकारी निवडीत मग्न झाले आहेत.त्याला कोपरगाव तालुका शिवसेवा उद्धव ठाकरे गट अपवाद नाही.त्यांनीही आगामी निवडणूक व त्यासाठी पक्ष बांधणीची गरज लक्षात घेऊन आपली पावले उचलली आहेत.त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या नुकत्याच झालेल्या नियुक्तीत निळवंडे कालवा कृती समितीत कालवे करण्यात सरकारला भाग पाडलेले युवा कार्यकर्ते व युवासेना कोपरगाव तालुका प्रमुख पदी विजय गोर्डे यांची नियुक्ती झाली आहे.

  

दरम्यान अन्य पदाधिकारी नियुक्ती झाली असून त्यात चंद्रकांत रामदास भिंगारे,प्रसाद दत्तात्रय सूर्यवंशी,विजय यादवराव भोकरे,गणेश राजेंद्र थोरात,कर्णा कारभारी जावळे या सर्वांची युवा सेना उपतालुकाप्रमुख पदी निवड झाली आहे.त्यांच्या निवडीमुळे निळवंडे कालवा कृती समिती व ग्रामीण कोपरगाव तालुक्यामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

     यावेळी निळवंडे कालवा कृती समितीचे नेते आप्पासाहेब भीमराज कोल्हे,कौसर रज्जाक सय्यद,प्रवीण दत्तात्रय कोल्हे,सुनील भाऊसाहेब गायकवाड,चंद्रकांत नानासाहेब पाडेकर,सतीश मंडाजी म्हाळसकर,सुमित बाळासाहेब कोल्हे,अमोल देवचंद खामकर,विकास नवनाथ पाडेकर,प्रकाश नवनाथ सरवार,आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सदर प्रसंगी आप्पासाहेब कोल्हे म्हणाले की,”बालपणापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना पक्षाची भूमिका व शिवसेनेचे काम ग्रामीण भागात सामान्य जनतेपर्यंत नेऊन पोहचवण्याचे काम विजय गोर्डे यांनी केले आहे.त्यांच्या निष्ठेची हि पोच पावती असल्याचे आप्पासाहेब कोल्हे यांनी शेवटी म्हटले असून या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close