जाहिरात-9423439946
निवड

आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी…या संस्थेच्या सरव्यवस्थापकांची निवड !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नॅशनल को-ऑप.क्रेडिट युनियन फेडरेशन ऑफ कोरियाच्यावतीने २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांची निवड झाली असल्याची माहिती संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

 

सचिन भट्टड यांनी सन-२०१५ मध्ये सरव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर संस्थेच्या ठेवी २७४ कोटी ७५ लाख इतक्या होत्या,आज २०२३ अखेरीस ८८१ कोटी ७३ लाख इतक्या झाल्या आहेत.समताला भेटी देण्यासाठी येत असलेल्या विविध भागातील पतसंस्था देखील त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावत असतात हि भूषणावह बाब मानली जात आहे.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोरिया देशातील सहकारी पतसंस्था चळवळ सर्वात प्रगत,शिस्तबद्ध व सुदृढ समजली जाते.भारतातील सरव्यवस्थापकांपैकी एकमेव निवड मुलाखतीतून करण्यात झाली आहे.भट्टड यांनी समता पतसंस्थेत क्लार्क पासून ते सरव्यवस्थापक पदापर्यंत स्वकर्तृत्वाने मजल मारली असून गेल्या २५ वर्षापासून संस्थेच्या माध्यमातून ग्राहक,सभासदांना प्रामाणिकपणे सेवा देत आहेत.त्यांनी २०१५ मध्ये सरव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर संस्थेच्या ठेवी २७४ कोटी ७५ लाख इतक्या होत्या,आज २०२३ अखेरीस ८८१ कोटी ७३ लाख इतक्या झाल्या आहेत.समताला भेटी देण्यासाठी येत असलेल्या विविध भागातील पतसंस्था देखील त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवत असतात.त्यांची बँकिंग क्षेत्राच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले जाते.

      कोरियातील सेऊल येथील मेरियट हॉटेलमध्ये ६ दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे.या प्रशिक्षणात अत्याधुनिक तंत्रज्ञान,नेतृत्व विकास,संस्थेचे अंतर्गत व्यवस्थापन आदी विषयांवर सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे.देशातून मुलाखतीत सर्वोत्कृष्ट ठरल्यामुळे सचिन भट्टड यांची या प्रशिक्षणासाठी कोरियातील निवास व प्रवास खर्च कोरियन फेडरेशन करणार असल्याचे कोरियन फेडरेशनचे अध्यक्ष व असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियनचे अध्यक्ष योन्सिक किम यांनी कळविले आहे.


       सचिन भट्टड यांची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,फेडरेशनचे संचालक,पदाधिकारी यांच्याकडून अभिनंदन होत असून समता पतसंस्थेचे उपाध्यक्षा श्वेता अजमेरे,ज्येष्ठ संचालक गुलाबचंद अग्रवाल,अरविंद पटेल,रामचंद्र बागरेचा,चांगदेव शिरोडे,जितूभाई शहा,गुलशन होडे,निरव रावलिया,कचरू मोकळ,संचालिका शोभा दरक आदींच्या वतीने अभिनंदन होत असून प्रशिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात येत आहे.तसेच देशातील विविध पतसंस्था फेडरेशन कडून ही त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close