जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

शहरात हद्दपार गुंडांचा गोळीबार,कोपरगावात गुन्हा दाखल नाही !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरात दिपावली पाडव्याच्या दिवशी दोन हद्दपार गुंडांनी मध्यरात्रीच्या सुमारास एका दिवट्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र येऊन वाळूचोर आणि त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होऊन गोळीबार केला असून ते आरोपी त्या घटनेपासून फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत असून या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही मात्र पोलीस त्यांचा शोध घेत असून घटनास्थळावरून असून त्यांना गोळीबाराची पुंगळी सापडली असल्याची माहिती आहे.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

  

दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने माहिती घेतली असता त्या गोळीबारातील पुंगळी एका पोलीसास घटनास्थळी सापडली होती त्याने ‘ती’ शहर पोलिसांकडे सुपूर्त केली असल्याची माहिती आहे.मात्र सदर गोळीबार हा वैयक्तिक कारणावरून की पूर्व वैमनस्यातून,की आनंदाच्या भरात केला हे मात्र समजले नाही.मात्र यातील एक गट एका माजी उपनगराध्यक्षांशी संबंधित असल्याचे समजते.मात्र त्याला आठवडा उलटला असताना अजून गुन्हा का दाखल झाला नाही ? याचे उत्तर अनुत्तरीत असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण बेसुमार वाढले आहे.उन्हाळ्यात सह्याद्री कॉलनीत लेखा परीक्षक दत्ता खेमनर यांची स्विफ्ट डिझायर,निवारा परिसरात डॉ.जगदीश झंवर व साईनगर परिसरात अड्.मनोज कडू यांच्या दोन मारुती एर्टीगा या तीन किमती कार एकाच रात्री लंपास केल्या होत्या.या शिवाय निवारा परिसरात एक सुमारे दोन लाखांची चोरी झाली होती.या शिवाय कोपरगाव बस स्थानक व अन्य नागरिकांना रात्री व पहाटेच्या वेळी फिरण्याच्या मार्गावरील चैन ओरबडण्याच्या व सोन्याचे दागिने पळविण्याचा घटनांची गणतीच नव्हती.बस स्थानकावरील चोऱ्या वेगळ्याच आहे.त्यामुळे पोलिसांचा धाक राहिला का ? असा सवाल नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.त्यामुळे या चोऱ्या वरचेवर वाढत चालल्या होत्या.याला आळा घालणे गरजेचे असताना त्यावर कुठलीही कार्यवाही होताना दिसत नाही.कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे नागरिकांनी काही संशयित दुचाकी चोरांना पकडले असल्याची समाधानकारक बातमी हाती आली होती.मात्र त्यात किती दुचाकी जमा झाल्या हे समजला मार्ग नाही.अशातच कोपरगाव शहरात गुन्हेगारी वाढली असल्याचे बोलले जात आहे.कोपरगावात असलेले काही उपनगरे उपद्रवमूल्य दाखविणारे असून त्यांच्यावर पोलिसांचा वचक राहिला नाही तर शहरातील शांतता भंग व्हायला वेळ लागणार नाही.त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांवर जबाबदारी वाढत चालली आहे.त्यातच हि ऐन सणासुदीच्या काळात हि चमत्कारिक घटना उघडकीस आली आहे.

   सदर घटनेत काही असामाजिक तत्व निवारा परिसरात साखरे स्टील जवळ मध्यरात्रीच्या सुमारास एकत्र येऊन आपल्या सोबत्याचा वाढदिवस साजरा करत असताना त्यातील दोन हद्दपार गुंड व काही वाळूचोर एकत्र आले होते.त्यात काही किरकोळ वादवादी होवून त्यात एका हद्द पार गुंडाने थेट गोळीबार केला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.सदर घटनेनंतर आमच्या प्रतिनिधीने याबाबत कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यास संपर्क केला असता त्यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे उघड झाले आहे.

    दरम्यान आज या बाबत आमच्या प्रतिनिधीने माहिती घेतली असता त्या गोळीबारातील पुंगळी एका पोलीस कर्मचाऱ्यास घटनास्थळी सापडली होती त्याने ‘ती’ शहर पोलिसांकडे सुपूर्त केली होती.मात्र त्याला आठवडा उलटला असताना अजून गुन्हा का दाखल झाला नाही ? या बाबत नागरिक चक्रावून गेले आहे.दरम्यान मोकाट आरोपी असेच मोकळे राहिले तर शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडायला वेळ लागणार नसल्याचे बोलले जात आहे.यातील संशियत आरोपींचे नावे शिदोरे व शिरसाठ असल्याची उपस्थित नागरिकांतच दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

   दरम्यान आज एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधीने याबाबत विचारणा केली असता त्यांनी या याबाबत पोलिसांनी कारवाई सुरु केली असल्याची काय तेवढी समाधानाची बाब सांगितली आहे.मात्र त्यात अद्याप कोणीही अटक नसल्याचे समजते.त्यामुळे आगामी काळात खरच पोलीस कारवाई करणार काय ? असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close