निवड
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्षपदी गव्हाणे यांची निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
प्रदेश संभाजी ब्रिग्रेड प्रदेश कार्यकारिणीची बैठक नुकतीच मुंबई येथे संपन्न झाली असून त्यात दशराथ यशवंत गव्हाणे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दशरथ गव्हाणे यांनी कृतिशील कार्यक्रम देण्याबरोबरच,मराठा आरक्षण,सामाजिक ज्वलंत प्रश्नावर आवाज ठेवणे,आंदोलने मोर्चे,रास्ता रोको,प्रबोधनपर कार्यक्रम,मराठा बहुजन समाजाच्या तरुणांमध्ये वैचारिकता निर्माण करण्याचे काम,प्रशासनातील काम,शेतकरी प्रश्न असो,सामाजिक एकोपा निर्माण करण्याचे कार्य,केले असल्याने राज्य कार्यकारिणी बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असल्याचे मानले जात आहे.
दशरथ गव्हाणे हे गेली २००४ पासून शाखा कार्यकर्ता,कार्याध्यक्ष,तालुका उपाध्यक्ष,तालुका कार्याध्यक्ष,जिल्हा उपाध्यक्ष,जिल्हाध्यक्ष,नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख,प्रदेश संघटक या पदावर सातत्य कार्य करत आहे.शिव,शाहू,फुले आंबेडकर या क्रांतिकारी महामानवांच्या विचारावर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रबोधन पर कृतिशील कार्यक्रम,मराठा आरक्षण,सामाजिक ज्वलंत प्रश्नावर आवाज ठेवणे,आंदोलने मोर्चे,रास्ता रोको,प्रबोधनपर कार्यक्रम,मराठा बहुजन समाजाच्या तरुणांमध्ये वैचारिकता निर्माण करण्याचे काम,प्रशासनातील काम,शेतकरी प्रश्न असो,सामाजिक एकोपा निर्माण करण्याचे कार्य,केले असल्याने राज्य कार्यकारिणी बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असल्याचे मानले जात आहे.
या निवडीची घोषणा प्रदेश महासचिव सुभाष बोरकर यांनी केली आहे.प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते निवडीचे पत्र दिले आहे.यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर राजे भोसले,प्रदेश समन्वयक अनिल पाटील,अजय भोसले रमेश हांडे,सचिन सावंत,सुधांशु मोहोड,आत्माराम शिंदे,प्रदीप कणसे आदी मान्यवर उपस्थित होते.