निवडणूक
बाजार समिती निवडणुकीत होणार परिवर्तन !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५ पैकी १८ बाजार समित्यांचे नेतृत्व महाविकास आघाडीकडे असून ०५ बाजार समित्या भाजपच्या ताब्यात आल्या आहे.तर नगर जिल्ह्यातील राहुरी येथील बाजार समिती माजी खा.प्रसाद तनपुरे व आ.पाजक्त तनपुरे यांनी राखली आहे.तेथे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांना मतदारांनी धूळ चारली आहे.श्रीरामपूर,संगमनेर व कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत वेगळी स्थिती रहाणार नाही अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे सत्तेसाठी एकत्र आलेल्यांचे धाबे दणाणले आहे.
“कोण निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम बंद करतो,कालव्यांचे उदघाटन करण्याच्या नावाखाली वाळू,खडी बंद करतो,कोण लाभक्षेत्राच्या बाहेर १५ टक्के पाणी आरक्षणाच्या नावाखाली पाण्यावर दरोडा टाकतो,कोण वाळूचोरीचा ठेका घेतो,कोण सभासदांना उसाच्या काट्यात,साखर उताऱ्यात मारतो,कोण गावोगावचे बस स्थानक,स्मशान भूमीचे ठेके आपल्या कार्यकर्त्याना देण्याऐवजी स्वतः ओरबाडून खातो,कोण जिल्हा परिषद व पंचायत समिती सत्तेच्या आडून आपला ठेका चालवतो,कोण आपल्या संस्थेत परप्रांतीयांना आणून गुपचूप रासरोस श्वेत अमृतात भेसळ करतो,कोण नेता आपल्या कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांकडे समोर नेऊन पुन्हा पश्चात फोनाफोनी करून काम करू नका म्हणतो तर कोणी निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यास खर्च करण्यास सांगून पुन्हा पाठ फिरवतो,महिलांच्या बाबतीत कोण चुकीच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालतो हा सगळा हिशोब चुकता होणार असल्याची तालुक्यात चर्चा आहे.
ग्रामिण भागातील राजकारणात व अर्थकारणात कृषी उत्पन्न बाजार समित्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात.राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बऱ्याच निवडणुका पार पडल्या असून कोपरगाव,श्रीरामपूर,राहाता,उर्वरित कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी ३० एप्रिल रोजी निवडणूक संपन्न होत आहे.त्यामुळे या निवडणुकांकडे राजकीय निरीक्षक व नागरिकांचे लक्ष लागून आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५ पैकी १८ बाजार समित्यांचे नेतृत्व महाविकास आघाडीकडे असून ०५ बाजार समित्या भाजपच्या ताब्यात आल्या आहे.तर नगर जिल्ह्यातील राहुरी येथील बाजार समिती माजी खा.प्रसाद तनपुरे व आ.प्राजक्त तनपुरे यांनी राखली आहे.तेथे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांना मतदारांनी धूळ चारली आहे.श्रीरामपूर,संगमनेर व कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत वेगळी स्थिती रहाणार नाही अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे सत्तेसाठी एकत्र आलेल्यांचे धाबे दणाणले आहे.
श्रीरामपूर तालुक्यात माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या अशोक सहकारी सहकारी साखर करण्यात गतवर्षी संपन्न झालेल्या निवडणुकीत शेतकरी संघटनेने प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली मोठी बिकट केली होती.त्यांचे पूण्याच्या लाल महालातील शाईस्तेखाना सारखे जीवावर बेतले होते मात्र ते केवळ बोटावर निभावले होते.त्यांमुळे त्यांना इच्छा नसताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व माजी स्व.आ.जयंत ससाणे यांचे पुत्र करण ससाणे यांच्या गळ्यात हात घालावा लागला आहे.यातच सर्व काही आले.श्रीरामपूर तालुक्यात शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी कॉंग्रेसचे आ.लहू कानडे,राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश आदिक आदींना सोबत घेतले आहे.व सर्व गावे पिजूंन काढली आहे.गावोगाव असलेल्या सभासदास भेटले नाही असे क्वचित दिसले अशी स्थिती आहे.त्यामुळे महसूल मंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.अशोक सहकारी कारखाना निवडणुकीने त्यांना एकत्र आणायला भाग पाडले हे वेगळे सांगायची गरज नाही.त्यामुळे आता निकाल काय लागणार हे सर्व सभासद व सत्ताधारी गट यांना कळून चुकले आहे.मात्र दिवा तेल संपायच्या वेळी जसा मोठा होतो तसा तो मोठा आकार धारण करतो अशी स्थिती सत्ताधाऱ्यांची शेवटी झाली असल्याचे दिसत आहे.त्यामुळे,”आज की कत्तल की रात” का तमाशा त्यांना वाचविणार काय अशी चर्चा सुरु झाली आहे.खरे तर श्रीरामपूर,राहाता,संगमनेर,कोपरगाव,अकोले,आदी ठिकाणचे सत्ताधारी हेच “असून अडचण नसून खोळंबा” ठरले आहे व मद्य निर्मितीच्या आडून शेतकऱ्याचे वैरी बनले आहे.याचा उत्तरोत्तर दाहक अनुभव शेतकरी दिवसेंदिवस घेताना दिसत आहे.शेतकरी हिताचा बुरखा पांघरणारे सत्ताधारी हा उत्तर नगर जिल्ह्यातील विकासाला मोठा रोडा ठरले आहे.हे वेगळे सांगणे न लगे !आज मतदार जागे झाल्याने त्यांना एकत्र यायला भाग पाडले आहे.यातच सर्व काही आले आहे.त्यामुळे आगामी दोन दिवसातील निवडणुकीतील चित्र सांगण्यास कोणा ज्योतिष्याची गरज उरली नाही.इतके चित्र स्पष्ट झाले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी कारखाना निवडणुकीने सत्ताधाऱ्यांना एकत्र आणायला भाग पाडले हे वेगळे सांगायची गरज नाही.त्यामुळे आता निकाल काय लागणार हे सर्व सभासद व सत्ताधारी गट यांना कळून चुकले आहे.मात्र दिवा तेल संपायच्या वेळी जसा मोठा होतो तसा तो मोठा आकार धारण करतो अशी स्थिती सत्ताधाऱ्यांची शेवटी झाली असल्याचे दिसत आहे.त्यामुळे,”आज की कत्तल की रात” का तमाशा त्यांना वाचविणार काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान तीच अवस्था कोपरगावात महसूल मंत्री विखे यांना भाजपचा कोल्हे गट,राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे,महानंदचे अध्यक्ष व महसूलमंत्री विखे यांचे मेहुणे राजेश परजणे,शिवसेनेचा तोतया गट आदींचा लांबलचक ताफा एकत्र करावा लागला आहे.यात या निवडणुकीची त्यांनी किती धास्ती घेतली आहे हे उघड झाले आहे.या मंडळींना अख्या निवडणुकीत मतदारांसमोर जाता आले नाही यातच सर्व काही आले आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील राष्ट्रवादीच्या अंतर्गत दोन गटात भर सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यावरून वाद निर्माण झाले होते.त्यातून त्यांचा तमाशा दुसऱ्या दिवशीही त्यांच्या विविध कार्यकारी विकास संस्थेच्या कार्यालयात झाला असल्याची विश्वसनीय माहिती आहे.त्यात कोपरगावच्या पश्चिम गडावरील माजी संचालक (माजी आ.काळे यांचेशी नामसाधर्म्य असलेले )व वर्तमान संचालक यांच्यात खडाजंगी तालुक्यातील चर्चेचा विषय ठरली आहे.हि घटना तालुक्यातील बेदिली दाखविण्यास पुरेशी ठरावी.त्यातच नितीन शिंदे या काँग्रेसी जिल्हा नेत्याने सत्ताधारी वर्गातील तीन-चार उमेदवार यांचे आपत्याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी बंधपत्र लिहून घेतले नाही याबाबत जिल्हा सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधक यांचेकडे तक्रार केलेली आहे.त्यामुळे उभे असलेले सत्ताधारी उमेदवार धास्तावुन गेले आहे.त्यामुळे त्यांच्या वरील विश्वास उडून गेला असे म्हटले तर वावगे ठरू नये.सत्ताधारी चौकडीचे उमेदवार सर्व सभासद यांचे पर्यंत पोहचले नाही हे सुर्य प्रकाशाच्या इतके स्वच्छ आहे.त्यामागे अर्थातच त्यांच्यात,’आत्मविश्वासाचा अभाव’ हे कारण मानले जात आहे.त्यामुळे तालुक्यातील सहकारातील सभासदांना एरवी आपल्या जाळ्यात ओढून गेली अनेक वर्ष नव्हे दशके पाहिजे तसे आपल्या पायाखाली तूडविणारे नेते एका निशाण्यात सापडले आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील राष्ट्रवादीच्या अंतर्गत दोन गटात भर सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यावरून वाद निर्माण झाले होते.त्यातून त्यांचा तमाशा दुसऱ्या दिवशीही त्यांच्या विविध कार्यकारी विकास संस्थेच्या कार्यालयात झाला असल्याची विश्वसनीय माहिती आहे.त्यात कोपरगावच्या पश्चिम गडावरील माजी संचालक (माजी आ.काळे यांचेशी नामसाधर्म्य असलेले )व वर्तमान संचालक यांच्यात खडाजंगी तालुक्यातील चर्चेचा विषय ठरली आहे.हि घटना तालुक्यातील बेदिली दाखविण्यास पुरेशी ठरावी.
त्या चारही नेत्यांची शिकार करण्याची दुर्मिळ संधी आगामी नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिती यांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर त्यांना मिळाली असल्याची जोरदार चर्चा तालुकाभर होत आहे.परिणाम समोर येणार आहे.कोण निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम बंद करतो,कालव्यांचे उदघाटन करण्याच्या नावाखाली वाळू,खडी बंद करतो,कोण लाभक्षेत्राच्या बाहेर १५ टक्के पाणी आरक्षणाच्या नावाखाली पाण्यावर दरोडा टाकतो,कोण वाळूचोरीचा ठेका घेतो,कोण सभासदांना उसाच्या काट्यात,साखर उताऱ्यात मारतो,कोण गावोगावचे बस स्थानक,स्मशान भूमीचे ठेके आपल्या कार्यकर्त्याना देण्याऐवजी स्वतः ओरबाडून खातो,कोण जिल्हा परिषद व पंचायत समिती सत्तेच्या आडून आपला ठेका चालवतो,बाजार समितीत विकासाला कोण आडवा येतो,आपल्या हितचिंतकाना आडून फायदा पोहचवतो,कोण खाजगी बाजार समित्या काढतो,कोण परदेशात व परप्रांतात सभासदांच्या पैशातून जमिनी घेतो,कारखाने घेतो,कोण कोण आपल्या संस्थेत परप्रांतीयांना आणून गुपचूप रासरोस श्वेत अमृतात भेसळ करतो,कोण नेता आपल्या कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांकडे समोर नेऊन पुन्हा पश्चात फोनाफोनी करून काम करू नका म्हणतो तर कोणी निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यास खर्च करण्यास सांगून पुन्हा पाठ फिरवतो,महिलांच्या बाबतीत कोण चुकीच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालतो हा सगळा हिशोब चुकता होणार असल्याची तालुक्यात चर्चा आहे.चोवीस तासात चित्र स्पष्ट होणार आहे त्याकडे राज्याचे व राजकीय धुरिणांचे लक्ष लागून आहे.