निवडणूक
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नेते गायब !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक ऐन रंगात आली असताना या निवडणुकीत प्रमुख नेत्यांनी फारकत घेतली असल्याचे दिसून येत असून आपल्या महाआघाडीतील उमेदवारांना वाऱ्यावर सोडून दिले असल्याचे दिसून येत असून त्यांनी पोहेगाव येथील प्रचाराचा नारळ फोडताना सुद्धा हजेरी लावली नाही त्यामुळे या काळे-कोल्हे-परजणे-औताडे गटातील उमेदवार नाराज असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे विरोधी आघाडीतील उमेदवार रंगात आले असून त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा चंग बांधला असून त्याबाबत त्यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान व्यापारी मतदार संघ हा कोणत्याच नेत्याच्या दावणीला बांधला जाणार नाही असे वातावरण होते.व तसा अलिखित करार झाला होता असे म्हटले जाते.मात्र काही व्यापाऱ्यांनी थेट माजी आ.कोल्हे यांच्या कुटूंबातील अर्धा (बऱ्याच जेष्ठ कनिष्ठ नेत्यांचे) डझन व्यक्तींचे फोटो लावून सामाजिक संकेतस्थळावर आपला प्रचार सुरु केला आहे.त्यामुळे व्यापारी मतदार संघ हा अपक्ष राहिलेला नाही हे उघड झाले आहे.त्यामुळे व्यापारी मतदार संघातही याची तीव्र प्रतिक्रिया उमटू शकत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”अ.नगर जिल्ह्यातील १४ बाजार समितीच्या निवडणुकीचा निडणुकांचा शिमगा नवीन वर्षात पेटला असून त्यांचा निवडणूक कार्यक्रम मार्च महिन्यात जाहीर होऊन आता येत्या ३० एप्रिल रोजी मतदान संपन्न होत आहे.त्याबाबत नुकतीच माघार संपन्न झाली असून त्यात अनेकांचे अर्ज तसेच राहिल्याचा मोठा दणका सत्ताधारी गटाला बसला असताना आता दुसरी गंभीर बाब समोर आली आहे.
दरम्यान बाजार समित्यांवर संचालक म्हणून जाणे हे आजही समाजात प्रतिष्ठेचे मानले जात आहे.कारण कोटय़वधी रुपयांच्या उलाढालीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार संचालकांना असतो.या बाजार समित्यांमधील किरकोळ कामांच्या निविदांपासून रस्ते,इमारतींच्या बांधकामांना परवानगी देण्याची,काटा खरेदी,पावत्या वसुली,त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी संचालकांवर असते अशा व्यवहारांत काळेबेरे होत असल्याची टीका उगीच होत नाही.या आर्थिक उलाढालीमुळेच अशा संचालक मंडळाच्या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात खर्च केला जातो.समितीचे सदस्य मोठय़ा प्रमाणावर असल्याने त्यांच्यावर प्रभाव टाकून बाजार समित्यांचे सदस्य हाच राजकीय मतदारसंघ तयार होतो.या समित्यांवर विशिष्ट राजकीय पक्षाचा प्रभाव निर्माण होतो.त्यामुळे समित्यांच्या निवडणुका राजकीय पक्षांच्या मदतीने होतात.मात्र कोपरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत वेगळी शैली अस्तित्वात आली आहे.व ती येथे यशस्वी झाली तर त्याची अंमलबजावणी राज्यभर नेते करण्यास मागेपुढे पाहणार नाही याचा बोध मतदारांनी घेणे गरजेचे बनले आहे.या नेत्यांची मुजोरी या निवडणुकीत ठेचली नाही तर पुढील जिल्हा परिषद,पंचायत समित्या,नगर परिषद निवडणुका या ‘राजा’ म्हणविणाऱ्या मतदारांना अवघड बनतील असा धोका उभा ठाकला आहे.
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आ.लहू कानडे,शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे,काँग्रेसचे नेते अविनाश आदिक आदी सामील होत असताना कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नेते मात्र गायब झाले असून ते फोनाफोनी करत असल्याचे समजत आहे.त्याबाबत मतदारांत तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे तालुक्यातील मतदारांनीं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान विरोधी परिवर्तन आघाडीतील नेत्यांनी नुकताच कोपरगाव शहरात विघ्नेश्वर मंदिरात आपल्या प्रचाराचा नारळ मोठ्या उत्साहात फोडला आहे.तर सत्ताधारी आघाडीतील नेत्यांनी आदेश देऊन पोहेगाव येथील (वक्रतुंड) गणेश मंदिरात आपल्या उमेदवारांना धाडून नारळ फोडण्याचा कार्यक्रम उरकून घेतला असला तरी त्यांनी त्या ठिकाणी थेट जाण्याचा प्रसंग टाळला आहे.त्या ठिकाणी त्या-त्या सहकारी साखर कारखाना गटातील संचालक हजेरी लावताना दिसत आहे.मात्र बऱ्याच ठिकाणी आपले नेतेच नाही म्हटल्यावर त्यांनीही या प्रचारात दांडी मारणे पसंत केले असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.याबाबत सत्ताधारी गटातील उमेदवाराने त्यास नाव न छापण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.त्यामुळे मतदारांत मोठी नाराजी असून अनेकांना सत्ताधारी गटाने आधीच उमेद्वारीबाबत चुना लावल्याने त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही त्यात आणखी मतदारांना पर्यंत नेते पोहचत नसल्याने निवडणुकीत जर नेते येत नसतील तर मतदार राजा नेमका कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.सहकारी चळवळीतील नेते आता आपला राजेशाही थाटासाठी ओळखले जात असून त्याची अनुभूती वर्तमान कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मतदारांना येत आहे.नेमकी हिच मेख विरोधी गटाने हेरली आहे.व त्यांनी आपला प्रचाराचा रोख त्या दिशेने वळवला आहे.त्यामुळे त्याची किंमत सत्ताधारी गटाला चुकवावी लागणार असल्याचे संकेत मतदारांकडून मिळत आहे.
त्यातच व्यापारी मतदार संघ हा कोणत्याच नेत्याच्या दावणीला बांधला जाणार नाही असे वातावरण होते.व तसा अलिखित करार झाला होता असे म्हटले जाते.मात्र काही व्यापाऱ्यांनी थेट माजी आ.कोल्हे यांच्या कुटूंबातील अर्धा (बऱ्याच जेष्ठ कनिष्ठ नेत्यांचे) डझन व्यक्तींचे फोटो लावून सामाजिक संकेतस्थळावर आपला प्रचार सुरु केला आहे.त्यामुळे व्यापारी मतदार संघ हा अपक्ष राहिलेला नाही हे उघड झाले आहे.त्यामुळे व्यापारी मतदार संघातही याची तीव्र प्रतिक्रिया उमटू शकत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.