जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

खरे कलावंत मानधनापासून वंचीत-…यांची खंत

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यासह अ.नगर जिल्ह्यातील खऱ्या नाट्यकर्मीना मानधन मिळत नसून असंबद्ध व राजकीय अभय असलेल्या कलावंतांना ते मिळत असल्याचे दुर्दैव असल्याची खंत राज्य नाट्य परिषदेचे सहकार्यवाहक सतीश लोटके यांनी कोपरगाव येथे प्रचार बैठकीत बोलताना व्यक्त केली आहे.

“नाट्य संघटनेच्या माध्यमातून आवाज निर्माण करायला किमान दहा वर्षे लागले आहे.आता कुठे सांस्कृतिक मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून सरकार ऐकायला लागले आहे.आम्ही तुम्हाला पाठबळ नक्की पुरवू पण तुम्ही संस्था स्थापन करा त्यास आम्ही प्रोत्साहन देऊ.नवीन तंत्रज्ञान पुरवू त्यासाठी नवीन तरुणांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी शिबीर घ्या  आपण त्यासाठी सहकार्य करू व कोपरगावात उपेक्षित असलेल्या खुल्या नाट्यगृहाचा आवाज वरिष्ठ पातळीवर उठवू”-सतिश लोटके,सहकार्यवाहक,अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन-२०२३-२८ साठी प्रचार मोहीमेसाठी आज कोपरगावात बैठक नाट्य परिषदेचे कार्यकर्ते सुशांत घोडके यांच्या पुढाकारातून मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी उमेदवार सतीश लोटके,क्षितिज झावरे,संजयकुमार दळवी,मनसेचे उपाध्यक्ष संतोष गंगवाल,कलासाई नाट्य मंडळाचे शैलेश शिंदे,संजय लोळगे,सागर मेहेत्रे,रवींद्र बुचकुले,गोविंद जवाद,नंदू मेंगाणे,संजय मंडलिक,महेश थोरात,गणेश सपकाळ,प्रीतम बंब,अजय कांगने,बनसोडे,बी.डी.जाधव,वैशाली काकडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,नाट्य कलेकडे सरकारचे दुर्लक्ष आहे.आम्हाला संघटनेच्या माध्यमातून आवाज निर्माण करायला किमान दहा वर्षे लागले आहे.आता कुठे राज्याचे सांस्कृतिक मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून सरकार ऐकायला लागले आहे.आम्ही तुम्हाला पाठबळ नक्की पुरवू पण तुम्ही संस्था स्थापन करा त्यास आम्ही प्रोत्साहन देऊ.नवीन तंत्रज्ञान पुरवू त्यासाठी नवीन तरुणांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी शिबीर घ्या आपण त्यासाठी सहकार्य करू व कोपरगावात उपेक्षित असलेल्या खुल्या नाट्यगृहाचा आवाज वरिष्ठ पातळीवर उठवू असे शेवटी आश्वासन दिले आहे.

सदर प्रसंगी क्षितिज झावरे,संजयकुमार दळवी,आदींनी नाट्यपरिषदेचे वर्तमान मांडले आहे.तर सुशांत घोडके,गोविंद जवाद यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या खुले नाट्यगृहाची झालेली दुरावस्था निदर्शनास आणली आहे,निवडून येणाऱ्या उमेदवारांनी नूतन नाट्य कर्मींना मदत करण्याची मागणी केली आहे.
तर नंदू मेंगाने यांनी अडचणीत असलेल्या नाट्यकर्मीना विशेष निवृत्ती अनुदान देण्याची मागणी लावून धरण्याची मागणी केली आहे.


श्री बुचकुले,गणेश सपकाळ,संतोष गंगवाल,रमेश टोरपे यांनी नवीन तंत्रज्ञान माहिती करण्याची व त्या सुविधा देण्याची व उदयोन्मुख ग्रामीण नाट्य कलावंतांना प्रोत्साहन देण्याची व सहकार्य करण्याची मागणी केली आहे.

सदर बैठकीचे प्रास्तविक सुशांत घोडके यांनी केले तर  सूत्रसंचालन रमेश टोरपे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गणेश सपकाळ यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close