जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव बाजार समितीचा निवडणूक शिमगा सुरु !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

अ.नगर जिल्ह्यातील कोपरगावसह १४ बाजार समित्यांच्या निवडणुकीचा शिमगा पेटला असून या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी जाहीर केली असून कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून नामदेव ठोंबळ यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली असून गत दोन दिवसात (७+ ४६) एकूण ५३ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समितीसाठी एकूण पात्र सभासद संख्या ०२ हजार ४८० असून त्यात विविध कार्यकारी सेवा संस्था सभासद संख्या ०१ हजार ४१३,ग्रामपंचायत सभासद संख्या-७७९,आडत व्यापारी मतदार संख्या-१९८,हमाल तोलणार-८६ अशी एकूण संख्या हि ०२ हजार ४८० इतकी आहे.त्यात सॊसायटी मतदार प्रतिनिधी-११ त्यात सर्वसाधारण-०७ महिला राखीव-०२,इतर मागास वर्गीय-०१ विमुक्त जाती/भटक्या जाती-०१,ग्रामपंचायत मतदार संघ-०४ असून यातील विगतवारी सर्वसाधारण-०२,अनुसूचित जाती/ जमाती-०१,आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक-०१,व्यापारी आडत-०२ प्रतिनिधी,हमाल-मापाडी-०१ प्रतीनिधी आहे.

दरम्यान अ.नगर जिल्ह्यातील १४ बाजार समितीच्या निवडणुकीचा निडणुकांचा शिमगा पेटला असून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.जिल्ह्यात दोन टप्प्यात बाजार समित्यांचा निवडणूका होणार आहेत.कोविडच्या दोन लाटा आणि त्यानंतर अतिवृष्टी यामुळे या बाजार समित्यांच्या निवडणूका दोन वर्ष रखडल्या होत्या.दुसरीकडे जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगर पालिका,नगर परिषदाच्या निवडणूक पुढील अनिश्चित काळासाठी पुढे ढकल्या गेल्या आहेत.यामुळे कोपरगाव राहात्यासह सर्व तालुक्यात राजकीय पक्षांनी आता आपले लक्ष बाजार समितीच्या निवडणुकीवर केंद्रीत केलेले आहे.यामुळे या सन-२०२३-२०२८ या कालावधीसाठी निवडणुकीतील चुरस वाढली आहे.यात पारंपरिक आ.आशुतोष काळे सह माजी आ.स्नेहलता कोल्हे गट व महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे हे पारंपरिक तीन गट आमने-सामने राहतात की मागील वेळे प्रमाणे बिनविरोध लढणार हे लवकरच कळणार आहे.

गत बाजार समिती निवडणूक हि सन-२०१५-१६ ते सन-२०२०-२१ या कालावधीसाठी झाली होती.त्या निवडणूकीच्यावेळी १५ जागा पैकी आ.काळे गट व माजी आ.कोल्हे गटास प्रत्येकी-०६ जागा परजणे गटास-०२ जागा तर शिवसेना (नितीन औताडे) गटास-०१ (मागासवर्गीय) जागा बिनविरोध देण्यात आल्या होत्या.तर सन-२०२० साली कोरोना साथीचे देशभरात आगमन झाल्याने व मोठी मनुष्यहाणी झाल्याने सदर निवडणुका या लांबणीवर टाकल्या होत्या व मुदत संपल्याने दि.१५ सप्टेंबर २०२१ रोजी कोपरगाव बाजार समितीवर प्रशासक राज (सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ) हे आले होते.

दरम्यान,१४ तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांची निवड करण्यात आली असून यात राहाता बाजार समितीसाठी रावसाहेब खेडकर आणि कोपरगाव बाजार समितीसाठी नामदेव ठोंबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी एकूण पात्र सभासद संख्या ०२ हजार ४८० असून त्यात विविध कार्यकारी सेवा संस्था सभासद संख्या ०१ हजार ४१३,ग्रामपंचायत सभासद संख्या-७७९,आडत व्यापारी मतदार संख्या-१९८,हमाल तोलणार-८६ अशी एकूण संख्या हि ०२ हजार ४८० इतकी आहे.

तर निवडून द्यावयाचे प्रतिनिधी शेतकरी प्रतिनिधी संख्या-१५ असून त्यात सॊसायटी मतदार प्रतिनिधी-११ त्यात सर्वसाधारण-०७ महिला राखीव-०२,इतर मागास वर्गीय-०१ विमुक्त जाती/भटक्या जाती-०१,ग्रामपंचायत मतदार संघ-०४ असून यातील विगतवारी सर्वसाधारण-०२,अनुसूचित जाती/ जमाती-०१,आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक-०१,व्यापारी आडत-०२ प्रतिनिधी,हमाल-मापाडी-०१ प्रतीनिधी आहे.

यामुळे प्रत्येक पक्ष (कोपरगाव तालुक्यात स्थानिक गट) बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी मोठी ताकद लावत असतो.यंदाही राजकीय पक्षांचा बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी कस लागणार आहे.मात्र यावेळी तालुक्यात खाजगी बाजार समित्यांचे पेट फुटले असल्याने या निवडणुकीकडे स्थानिक नेते किती किमंत देणार याकडे राजकिय निरीक्षक,स्थानिक कार्यकर्ते आणि मतदार यांचे लक्ष लागून आहे.

अशी होणार निवडणूक २७ मार्च अर्ज दाखल करण्यास सुरुवात,३ एप्रिल अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख,५ एप्रिल-अर्जांची होणार छाननी,६ एप्रिल-अर्ज मागे घेण्यास सुरुवात,२० एप्रिल-अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख,२१ एप्रिल-अंतिम यादी प्रसिद्ध व निशाणी वाटप,३० एप्रिल रोजी मतदान सकाळी ०८ ते दुपारी ०४ वाजे पर्यंत (तीन दिवसांच्या आत मतमोजणी स्थळ नंतर घोषित करण्यात येणार आहे)

नव्याने निवडणूक झालेल्यांना ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांची सभासदांची नावेही अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.२७ मार्च पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्याची तपासणी मतदारांनी करावी असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close