जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव तालुक्यातील…या सोसायटीची निवडणूक बिनविरोध संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील टाकळी विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली असून या सेवा संस्थेची बिनविरोध निवडणूकीची परंपरा कायम राखल्याने सभासदांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले आहे.

करोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून स्थगित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा तिसरा टप्पा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे.तिसऱ्या टप्प्यात २७ हजार १३८ सहकारी संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात आहेत.त्यानुसार टाकळी सहकारी सेवा संस्थेची निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती टाकळी ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी देवकर यांनी दिली आहे.

करोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून स्थगित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा तिसरा टप्पा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. तिसऱ्या टप्प्यात २७ हजार १३८ सहकारी संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात आहेत.त्यामध्ये साखर कारखाने,पतसंस्था,नागरी सहकारी बँका,सहकारी सूतगिरण्या,सहकारी दुग्ध संस्था,कृषी पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्थांचा समावेश आहे.प्रलंबित निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी दिले आहेत.त्यानुसार टाकळी येथील सेवा सहकारी सेवा संस्थेची निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

या निवडणुकीत कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप देवकर,भागवत देवकर,माजी अध्यक्ष रामदास देवकर,अंबादास देवकर,राजेंद्र देवकर आदींचे सहकार्य लाभले आहे.त्यांनी अल्पसंख्याक सभासदाना विशेष न्याय दिल्याने अल्पसंख्याक सभासदांनीं समाधान व्यक्त केले आहे.

या निवडणुकीत संचालक म्हणून सर्वसाधारण गट रामदास पुंजा देवकर,संदीप श्रीपाद देवकर,राजेंद्र निवृत्ती देवकर,पुंडलिक त्र्यंबक देवकर,कारभारी पिराजी देवकर,गोपीनाथ एकनाथ देवकर,गोरख सीताराम देवकर,रामनाथ एकनाथ देवकर आदींची निवड झाली आहे.

तर अनुसूचित जाती-जमाती वर्ग -रमेश सोपान ननवरे या शिवाय महिला राखीव-मंगल बाळासाहेब देवकर,गीता अशोक देवकर यांची वर्णी लागली आहे.आणि इतर मागासवर्गीय-लक्ष्मण नामदेव मालकर,छबू त्र्यंबक पाईक यांचे नशीब उजळले आहे.
सदर प्रसंगी सोसायटीचे सर्व वरिष्ठ सभासद व भाजप गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सदर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी
यांनी काम पाहिले आहे.त्यांना सचिव यांनी सहाय्य केले आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे,संजीवनी साखर कारखाण्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे आदींसह सभासदांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close