जाहिरात-9423439946
निवडणूक

शिर्डीत वि.का.स.संस्थेच्या…या पॅनलला वाढता प्रतिसाद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

शिर्डी-(प्रतिनिधी)

शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचा सन २०२२-२७ निवडणूक प्रचार अंतिम टप्यात आला असून या निवडणुकीत दोन गटापैकी परिवर्तन पॅनलला सभासदांचा मोठा प्रतिसाद लाभत असून त्यांची निवडुन येण्याची शक्यता वाढली असल्याची नागरिकांत चर्चा आहे.त्याला सेनेचे शहराध्यक्ष सचिन कोते यांनी दुजोरा दिला आहे.

“कृषी क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या प्रक्रिया उद्योगातून शेतकरी पुत्रांना त्याचा फायदा करता येऊ शकतो मात्र त्या बाबत सत्ताधारी वर्गाची अनास्था कारणीभूत आहे.शहरात मोक्याच्या जागी संस्थेची जागा असूनही त्याचा वाणिज्यिक कारणासाठी संस्थेला वापर करता येत नाही.त्यामुळे शेतकरी सभासदांची आगामी पिढी बरबाद होताना दिसत आहे.मात्र सत्ताधारी वर्गाने डोळ्यात कातडे ओढून घेतले आहे.त्यामुळे भावी पिढीपुढे अंधार निर्माण झाला आहे”-दत्तात्रय कोते,जिल्हाध्यक्ष मनसे, व नगरसेवक शिर्डी नगरपंचायत.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”राज्यातील सहकारी सेवा संस्थांच्या निवडणूका संपन्न होत असून यात राहाता तालुक्यातील शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था हि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जात आहे.तीची पंचवार्षिक निवडणूक येत्या १४ मे रोजी संपन्न होत आहे.त्यासाठी राजकीय आखाड्यात भाजप समर्थक आ.विखे समर्थक व राष्ट्रवादी समर्थक रणांगणात आहेत त्यांना कडवे आव्हान देण्यासाठी साई संस्थानचे विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली वीरभद्र परिवर्तन पॅनेल उभा ठाकला आहे.त्यांचा प्रचाराचा शुभारंभ नुकताच बिरोबा बन येथे श्री वीरभद्र मंदिरात संपन्न झाला आहे त्यानंतर प्रचार मोठ्या उत्साहात सुरु असून त्यावरून सभासदांत घराणेशाही व त्यातील तेच ते चेहरे व विकास कामांचा अभाव यावर उलटसुलट चर्चा सुरु आहे.

या संस्थेचे शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठे महत्व आहे हे कोणालाही नाकारून चालणार नाही.शिर्डी हे आतंरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून त्यासाठी दिवसेंदिवस वाढणारी व होणारी गर्दी हि या निवडणुकीतील विषय नाही मात्र जागेचे वाढणारे प्रचंड भाव व शेतीची होणारे कमी क्षेत्र हा काळजीचा विषय आहे.कृषी क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या प्रक्रिया उद्योगातून शेतकरी पुत्रांना त्याचा फायदा करता येऊ शकतो मात्र त्या बाबत सत्ताधारी वर्गाची अनास्था कारणीभूत आहे.शहरात मोक्याच्या जागी संस्थेची जागा असूनही त्याचा वाणिज्यिक कारणासाठी संस्थेला वापर करता येत नाही.त्यामुळे शेतकरी सभासदांची आगामी पिढी बरबाद होताना दिसत आहे.मात्र सत्ताधारी वर्गाने डोळ्यात कातडे ओढून घेतले आहे.त्यामुळे भावी पिढीपुढे अंधार निर्माण झाला असल्याची प्रतिक्रिया मनसेचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक दत्तात्रय कोते यांनी दिली आहे.

सभासदांना आगामी काळात विकासासाठी सत्तांतर करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.दारणा धरणाचे बिगर सिंचन आरक्षण मोठ्या प्रमाणावर वाढले असून शेती सिंचनासाठी पाणी शिल्लक ठेवले नाही.मात्र यावर सत्ताधारी बोलायला तयार नाही.त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी असल्याचे जाणवत आहे.
परिवर्तन पॅनेलने प्रभावी पर्याय दिल्याने सभासदांत मोठा उत्साह दिसून येत आहे.त्यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मोठा प्रतिसाद वाढला आहे असा दावा साईनागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व जेष्ठ नेते अशोक कोते यांनी केला आहे.

या लढाईत साईबाबा संस्थानचे विश्वस्त व काँग्रेसचे नेते डॉ.एकनाथ गोंदकर,शिर्डी शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन पाराजी कोते,शिर्डी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नितीन शेळके,मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते,सेनेचे माजी शहराध्यक्ष संजय शिंदे,रामराव शेळके,दिलीप कोते,नानासाहेब शिंदे,काकासाहेब शिंदे,माधव शिंदे,कमलेश लोढा,रमेश जगताप,गंगाधर कोते,नानासाहेब काटकर,राजेंद्र वाघ आदी कार्यकर्ते व त्यांचे सहकारी झोकून देऊन काम करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close