जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात पोलिसांवर जीवघेणा हल्ला,पंधरा जणांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

शिर्डी -(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय बोकाळला असून त्याचा प्रतिबंध करण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी असलेले आरोपी गुलाब रतन माळी,रतन माळी,वसंत मोरे,नवनाथ माळी,गुलाब माळी यांचेसह त्यांचे आजूबाजूला राहणारे दहा ते पंधरा जणांनी पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब दौलत पवार व त्यांच्या सहकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कोपरगाव व शिर्डी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रमुख आरोपी गुलाब माळी याचा मेहुणा वसंत व नवनाथ यांनी दोन्ही पोलिसांचे हात पिरगाळून लाथाबुक्यांनी मारहाण केली.त्यातील एक पोलीस कर्मचारी या मारहाणीच्या घटनेचे आपल्या भ्रमणध्वनीत चलचित्रण करत असताना त्यातील एका महिलेने त्यांचा तो भ्रमणध्वनी हिसवकावून घेतला व फेकून दिला आहे.त्याच वेळी गुलाब माळी याने तेथील दारूचे बॉक्स जमिनीवर जोरात आपटून त्यातील फुटलेली बाटली घेऊन पो.कॉ.पवार यांचे गळ्यावर वार केला करून जीवे मारण्याचा आरोप केला आहे.त्यातून पवार हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,शिर्डी येथील पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की,”जवळके ग्रामपंचायत हद्दीत भिल्ल वस्तीत गुलाब माळी याचे राहत्या घराचे आडोशाला मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर दारू विक्री चालू असून त्या ठिकाणी कारवाई करावी असे आदेश त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिले होते.

त्या आदेशाबरहुकूम पोलिस नाईक किशोर औताडे व त्यांचे सहकारी भाऊसाहेब दौलत पवार असे दोघे घटनास्थळी दि.०६ मे च्या रात्री ११.३० च्या सुमारास घटनास्थळी गेले असता त्यांना गुलाब माळी हा आपल्या भिंतीच्या आडोशाला स्टीलच्या पिंपावर दोन भिंगरी संत्रा देशी दारूचे बॉक्स ठेऊन विकत असताना आढळून आला होता.त्यास संबधित कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता त्यांने,”माझा माल आहे,तुम्हाला काय करायचे आहे”असे म्हणून गुलाब माळी याने त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.घटनास्थळावरून तो पळून जाऊ नये म्हणून त्यांनी त्यास पकडले असता त्याने मोठमोठ्याने आरडाओरडा करून नजीकच्या नातेवाईकांना गोळा केले.व म्हणाला की,”यांना येथून जिवंत जाऊ द्यायचे नाही”असे म्हणताच एकाने त्याच्या हातात असलेल्या कड्याने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या डाव्या डोळ्याच्या भुवयींवर मारले.त्यावेळी त्याची पत्नी,आई,वडील रतन माळी,बहिणी,तसेच गुलाब माळी याचे दहा ते पंधरा नातेवाईक यांनी यांनी सदर ठिकाणी हातात लाकडी दांडके,दगड,घेऊन आरडाओरडा करून शिवीगाळ करून पोलिसांच्या अंगावर धावून आले.त्यावेळी त्यांनी लाथाबुक्यांनी दगड,लाकडी दांडक्याने मारहाण केली व गुलाब माळी यास पोलिसांच्या ताब्यातून सोडवून घेतले आहे.

दरम्यान प्रमुख आरोपी गुलाब माळी याचा मेहुणा वसंत व नवनाथ यांनी दोन्ही पोलिसांचे हात पिरगाळून लाथाबुक्यांनी मारहाण केली.त्यातील एक पोलीस कर्मचारी या मारहाणीच्या घटनेचे आपल्या भ्रमणध्वनीत चलचित्रण करत असताना त्यातील एका महिलेने त्यांचा तो भ्रमणध्वनी हिसवकावून घेतला व फेकून दिला आहे.त्याच वेळी गुलाब माळी याने तेथील दारूचे बॉक्स जमिनीवर जोरात आपटून त्यातील फुटलेली बाटली घेऊन पो.कॉ.पवार यांचे गळ्यावर वार केला करून जीवे मारण्याचा आरोप केला आहे.त्यातून पवार हे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.यात त्यांच्या खाजगी गाडीचे नुकसान केले आहे.
दरम्यान त्याच वेळी गुलाब माळी हा पोलिसांना म्हणाला की,”तुम्ही आमच्यावर कारवाई कराल तर जवळके गावातून तुम्हाला जिवंत जाऊ देणार नाही”असे म्हणून दमदाटी करून सदर ठिकाणाहून पळून गेला असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान या घटनेतील आरोपी आरोपी रवींद्र उर्फ गुलाब रतन माळी (वय-२३),वसंत विठ्ल मोरे (वय-४०)नितीन राजू मोरे (वय-२१),नवनाथ सुभाष माळी (वय-३०),राजू सोन्याबापू मोरे (वय-४५),अलंका राजू मोरे (वय-४५),मंगल रतन माळी (वय-४८),अनिता ज्ञानेश्वर माळी (वय-३५) रा.जवळके आदी आठ जणांना शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी शिर्डी पोलिसांत आरोपी विरुद्ध फिर्यादी पोलीस नाईक किशोर अस्तिकराव औताडे यांनी गुन्हा क्रं.२०५ भा.द.वि.कायदा कलम ३०७,३५३,१४३,१४७,१४८,१४९,३३२,४२७५०४,५०६,प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संभाजी पाटील हे करित आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close