जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

शिर्डीतील…या संस्थेचा आज प्रचाराचा नारळ फुटणार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी आणि परिसरातील शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनू म्हणून गणल्या जाणाऱ्या शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची निवडणूक शनिवार दि.१४ मे रोजी संपन्न होत असून त्यासाठी दोन स्वतंत्र पॅनल रणांगणात उतरले असून त्यातील यशाचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या ‘परिवर्तन पॅनल’चा आज ‘बिरोबा बन’ येथे वीरभद्र महाराज यांच्या साक्षीने सकाळी १० वाजता प्रचाराचा नारळ फुटणार असल्याची माहिती या पॅनलचे नेते व साईबाबा संस्थानचे जेष्ठ विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

शिर्डीच्या राजकीय आखाड्यात भाजप समर्थक आ.विखे समर्थक व त्यांना राष्ट्रवादी समर्थक कार्यकर्त्यांनी दंड थोपटले असून राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाआघाडी राज्यात कार्यरत असताना शिर्डीत मात्र आक्रीत घडले आहे.येथे सत्ताधारी महाघाडीत कार्यरत असलेल्या व महत्वाची भूमिका निभावत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याला शिर्डीत छेद दिला आहे.त्यामुळे त्यावर सभासद आणि नागरिकांत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”मागील दोन वर्षांमध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.मात्र या सहकारी संस्थेच्या निवडणुका घेण्याबाबतचा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी गत महिन्यात पारित केला आहे.०१ एप्रिल पासून राज्यात या निवडणुकांचा धूरळा उडण्यास सुरुवात झाली असून निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या उमेदवारांना आता तयारीनिशी उतरावे लागणार आहे.त्यातील शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था हि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जात आहे.तीची पंचवार्षिकबनिवडणूक येत्या १४ मे रोजी संपन्न होत आहे.त्यासाठी राजकीय आखाड्यात भाजप समर्थक आ.विखे समर्थक व त्यांना राष्ट्रवादी समर्थक कार्यकर्त्यांनी दंड थोपटले असून राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाआघाडी राज्यात कार्यरत असताना शिर्डीत मात्र आक्रीत घडले आहे.येथे सत्ताधारी महाघाडीत कार्यरत असलेल्या व महत्वाची भूमिका निभावत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याला छेद दिला आहे.त्यामुळे त्यावर सभासद आणि नागरिकांत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान या अभद्र युतीला टक्कर देण्यासाठी पारंपरिक आ.विखे विरोधक असलेले साईबाबा संस्थानचे विश्वस्त व काँग्रेसचे नेते डॉ.एकनाथ गोंदकर यांची काँग्रेस,शिवसेना,मनसे,रा.स.प.आदींनी रणशिंग फुंकले आहे.त्यांना साथ देण्यासाठी जेष्ठ नेते साई नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कोते,शिर्डी शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन पाराजी कोते,शिर्डी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नितीन शेळके,मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते आदींनी साथ दिली आहे.त्यामुळे हा राजकीय सामना चांगलाच रंगणार असे चित्र निर्माण झाले आहे.त्यासाठी परिवर्तन पॅनेलने जोरदार तयारी केली आहे.

या ‘परिवर्तन पॅनल’चे चिन्ह ‘कपाशी’ आहे.या प्रचाराच्या नारळ फोडण्याचा कार्यक्रमास सभासद नागरिक शेतकरी आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जेष्ठ नेते अशोक कोते,सचिन पाराजी कोते,नितीन शेळके,दत्तात्रय कोते आदींनी केले आहे

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close