निवडणूक
अशोकच्या सत्ताधाऱ्यांच्या रात्रीच्या आर्थिक प्रचाराला बळी पडू नये-रघुनाथ दादा
न्यूजसेवा
श्रीरामपूर-(नानासाहेब जवरे)
आज शेतकरी संघटनेचा प्रचार संपणार आहे पण मुरुकुटेचा आर्थिक प्रचार रात्री सुरू होणार आहे.त्याला अशोक सहकारी कारखान्याच्या सभासदांनी बळी पडू नये असे आवाहन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी केले असून आगामी ४८ तासाच्या “कत्तल की रात्री”च्या आठवण करून सभासदांना या आर्थिक प्रलोभणाला बळी न पडण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.
असा बाप होणे नाही!…ज्ञानेश्वर भानुदास मुरकुटे
एखादा बाप आपल्या मुलाला म्हणेल का,” ज्ञानेश्वर हा माझा पुत्र नाही.मी त्यांना जाहीर विचारतो तुम्ही तुमचे अन्य तीन मुले तुमची आहे का ? याची तपासणी करून घ्या…एखाद्या अपत्याबाबत असा आक्षेपार्ह बोलणारा बाप जगात होणार नाही असे उदगार माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे जेष्ठ पुत्र ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी थेट आपल्या पिताश्रीना जाहीरपणे विचारला आहे.व तुमच्या पच्छात सगळे व्यवस्थित चालेल तुम्ही काही काळजी करू नका.निवांतपणे या जगाचा निरोप घेतला तरी हरकत नाही.असा जाहीर सल्ला दिला आहे.व मताचा पैसा द्यायला आमचेकडे काही नाही वाट पाहू नका.पण…त्यांचे घ्यायला काही हरकत नाही…आम्ही काही भ्रष्टाचार करत नाही.शेतकरी संघटनेकडे तर द्यायला काहीच नाही.
शेतकरी संघटना जेंव्हा आंदोलन करत होती तेंव्हा मुरकुटेसारखे राजकारणी तेंव्हा या संघटनेला नाव ठेवण्यात आघाडीवर होते.ऊसाचा भाव ५६०रुपयांवर अडीच हजारांच्या पुढे नेला आहे.लेव्ही याच शेतकरी संघटनेने रद्द करून राज्यात झोन बंदी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त दर देणाऱ्या कारखान्यांना तो देता येतो.याचे स्रेय शेतकरी संघटनेचे आहे.आम्ही लेव्हीची साखर उचलली तर कोणाही ट्रक वाल्याने ते भरली नाही एवढे वजन शेतकरी संघटनेचे आहे.त्यामुळे ट्रक बारामतीत पेटवली तर त्याची दखल शरद पवारांनी ती दिल्लीतून घेतली व कमीं करून घेतली आहे.तेंव्हा मुरकुटे कुठे होते.आज आमचा प्रचार संपणार आहे पण मुरुकुटेचा आर्थिक प्रचार सुरू होणार आहे.त्याला बळी पडू नका.इथेनॉलच्या पैसा शेतकऱ्याच्या खिशात आला पाहिजे अशी आमची भूमिका घेतली आहे.अड.अजित काळे यांनी आपल्या पिताश्री स्व.बबनराव काळे यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करायचे आहे.पण जनतेची लूट थांबविण्यासाठी त्यानी अशोक कारखाना निवडणूक लढवली आहे.मतदारांनी दोन पाच हजारांसाठी आपले मत विकू नका असे आवाहन शेवटी केले आहे.व आजची गर्दी पहिली की वाटते आता निकालाची वाट पहाण्याची गरज वाटत नाहीअसा विश्वास व्यक्त केला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कामधेनू म्हणून महत्वपूर्ण असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक येत्या रविवार दि.१६ जानेवारी रोजी संपन्न होत असून त्यासाठी सत्ताधारी माजी आ.मुरकुटे गटाच्या विरुद्ध शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली माजी अध्यक्ष इंद्रनाथ थोरात,राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिंटणीस अविनाश आदिक,नगराध्यक्षा अनुराधा आदिक,श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ.वंदना मुरकुटे यांच्या सहकार्याने सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध मोठे आव्हान निर्माण केले आहे.त्यामुळे प्रचार सभेचा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यासाठी नुकतेच वडाळा महादेव येथे आज सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास प्रचार सभा आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उत्तमराव पवार हे होते.
सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,उपाध्यक्ष अड.अजित काळे,अशोक कारखाण्याचे माजी अध्यक्ष इंद्रनाथ थोरात,नगर जिल्हा खजिनदार रुपेंद्र काले,श्रीरामपूरचे क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले,राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक,श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ.वंदना मुरकुटे,पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते,दीपक जगताप,अड.सर्जेराव कापसे,आदी मान्यवरांसह बहुसंख्य शेतकरी सभासद उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”शेतकरी संघटना जेंव्हा आंदोलन करत होती तेंव्हा मुरकुटेसारखे राजकारणी तेंव्हा या संघटनेला नाव ठेवण्यात आघाडीवर होते.ऊसाचा भाव ५६० रुपयांवर अडीच हजारांच्या पुढे नेला आहे.लेव्ही याच शेतकरी संघटनेने रद्द करून राज्यात झोन बंदी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त दर देणाऱ्या कारखान्यांना तो देता येतो.याचे स्रेय शेतकरी संघटनेचे आहे.आम्ही लेव्हीची साखर उचलली तर कोणाही ट्रक वाल्याने ते भरली नाही एवढे वजन शेतकरी संघटनेचे आहे.त्यामुळे ट्रक बारामतीत पेटवली तर त्याची दखल शरद पवारांनी ती दिल्लीतून घेतली व कमीं करून घेतली आहे.तेंव्हा मुरकुटे कुठे होते.आज आमचा प्रचार संपणार आहे पण मुरुकुटेचा आर्थिक प्रचार सुरू होणार आहे.त्याला बळी पडू नका.इथून पुढे शेतकऱ्यांना इथेनॉलचा पैसा शेतकऱ्याच्या खिशात आला पाहिजे अशी आमची भूमिका घेतली आहे.अड.अजित काळे यांनी आपल्या पिताश्री स्व.बबनराव काळे यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करायचे आहे.पण जनतेची लूट थांबविण्यासाठी त्यानी अशोक कारखाना निवडणूक लढवली आहे.मतदारांनी दोन पाच हजारांसाठी आपले मत विकू नका असे आवाहन शेवटी केले आहे.व आजची गर्दी पहिली की वाटते आता निकालाची वाट पहाण्याची गरज वाटत नाहीअसा विश्वास व्यक्त केला आहे.
सदर प्रसंगी अड्.अजित काळे म्हणाले की,”कारखाण्याच्या निवडणुकीचा जाहिरनाम्यावर व शेतकरी नेत्यांवर ते एक चकार शब्द बोलू शकले नाही.सभासद हाच कारखाण्याचा मालक आहे.हे तुम्ही विसरले आहे.तुम्ही शेतकऱ्यांनाच पिळविण्याचा धंदा उभारला आहे.हे आता संपले पाहिजे आहे.रघुनाथ दादा,स्व.बबनराव काळे यांची सारखे अनेक शेतकरी नेते आपले आयुष्य ओवाळून टाकत आहे.लेखा परीक्षक असलेल्या नेत्यांना कारखान्यांची खरी गाळप क्षमता अद्याप माहिती नाही हे एक आक्रीत आहे.आम्ही त्यावर बोलल्यावर ही सत्ताधारी मंडळी पोपटपंची करायला लागली हे ओळखा.कारखाण्याची गाळप क्षमता वाढवली तरच ऊस दर वाढू शकतो आम्ही हे शेतकऱ्यांना दर वाढून देऊ शकतो.प्रचार संपला पण हे जाहिरनाम्यावर बोलूच शकले नाही.व्यवस्थापनाच्या चोऱ्या उघड्या पडण्याच्या भीतीने हे जाहीर बोलू शकले नाही.बोलणार नव्हते हे आधीच माहिती होते.आणि तेच खरे ठरले आहे.मुद्यावर बोलू शकणारे गुद्यावर येतात.येत्या निवडणुकीनंतर आपण स्वाभिमानाने सभासदत्व स्वीकारणार आहे.व सभासदांच्या संमतीने होणार आहे. शेतकरी संघटनेचे सर्व उमेदवारांच्या कप-बशीच्या चिन्हावर शिक्का मारून विजयी करण्याचे आवाहन शेवटी केले आहे.
या वेळी श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ.वंदना मुरकुटे या चारोळ्यातून त्यांच्या सासऱ्यांना उत्तर देत म्हणाल्या की,
“मुलगा करतो गुरुगुरु,सून चालते तुरुतुरु”..पण ते पुढे बोलण्याचे विसरले (भानुदास मुरकुटे) यांना मी म्हणते ते (माजीआ.मुरकुटे) करतात मरू…मरू…!
आम्ही तोडीस तोड बोलू शकतो.तुम्ही ब्राम्हणाच्या आळीत रहात नव्हता मग तुमची मुलगी देत असलेल्या शिव्या कुठे शिकली आहे ? तेंव्हा ती कोणत्या आळीत होती ? असा कडवा सवाल आपल्या सासऱ्यांस (माजी.आ.भानुदास मुरकुटे) यांना विचारला आहे.त्यांनी त्यावेळी सम्राट हिरण्यकश्यपू व भक्त प्रल्हादाची गोष्ट सांगून अन्योक्ती पद्धतीने माजी आ.मुरकुटे विरुद्ध यांचेवर कडवे टीकास्त्र सोडले आहे.व त्यांच्या सासऱ्यांनी फार मोठे (?) काम केल्याने त्यांचा पुतळा उभारण्यास परवानगी उपस्थित मान्यवरांना विनंती करून मागितली आहे.त्यावेळी मोठा हशा…
असा बाप होणे नाही!…ज्ञानेश्वर भानुदास मुरकुटे
एखादा बाप आपल्या मुलाला म्हणेल का,” ज्ञानेश्वर हा माझा पुत्र नाही.मी त्यांना जाहीर विचारतो तुम्ही तुमचे अन्य तीन मुले तुमची आहे का ? याची तपासणी करून घ्या…एखाद्या अपत्याबाबत असा आक्षेपार्ह बोलणारा बाप जगात होणार नाही असे उदगार माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे जेष्ठ पुत्र ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी थेट आपल्या पिताश्रीना जाहीरपणे विचारला आहे.व तुमच्या पच्छात सगळे व्यवस्थित चालेल तुम्ही काही काळजी करू नका.निवांतपणे या जगाचा निरोप घेतला तरी हरकत नाही.असा जाहीर सल्ला दिला आहे.व मताचा पैसा द्यायला आमचेकडे काही नाही वाट पाहू नका.पण…त्यांचे घ्यायला काही हरकत नाही…आम्ही काही भ्रष्टाचार करत नाही.शेतकरी संघटनेकडे तर द्यायला काहीच नाही.
सदर प्रसंगी सि.वाय.पवार यांनी सतिष गुजर यांचेसह अन्य तिघांनी अशोक सहकारी साखर कारखान्याचा भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी करण्याचे राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना दिलेले निवेदन वाचून दाखवले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,”सन-२००४-०५ च्या हंगामात ऊसाची उपलब्धता असताना ती ०१लाख ७५ हजार टन दाखवून गाळप हंगाम परवाना मिळवला त्यातून राज्य बँकेकडून कर्ज मिळवून त्याचा असंदर्भ कामासाठी विनियोग केला अशा स्वरूपाचे गंभीर आरोप त्यात केले आहे.याखेरीज सन-२००४-०५ ते २००७-०८ या चार वर्षात अनेक गैरव्यवहार झालेला असून संचालक मंडळाच्या चुकीच्या निर्णयामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे.व त्याची भरपाई सभासदांकडून केल्याचा गंभीर आरोप या पत्रात केलेला असताना सचिन गुजर आज माजी आ.भानुदास मुरकुटे यांना कोणत्या गंगेच्या पाण्याने अंघोळ घालून पावन करून त्यांच्या सोबत गेले आहे? असा भेदक सवाल केला आहे.
वडाळा महादेव येथे शेतकरी संघटनेच्या सांगता सभेस अशोकच्या सभासदांनी मोठी गर्दी केली होती. त्याचे वारा कुठे वाहतो याचे बोलके छायाचित्र.
सदर प्रसंगी प्रास्तविक राजेंद्र पवार यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन अशोक कारखाण्याचे माजी अध्यक्ष इंद्रनाथ थोरात,राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक,नगराध्यक्षा अनुराधा आदिक,शिवाजीराव नांदखिले,पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते,जितेंद्र भोसले,सुरेश ताके,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे,रुपेंद्र काले,अड.सर्जेराव कापसे आदींनी केले आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बंडू पवार यांनी केले
उपस्थित शेतकरी संघटनेच्या उमेदवारांची ओळख किशोर बकाल यांनी करून दिली आहे.
तर उपस्थितांचे आभार प्रदेश राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश आदिक यांनी मानले आहे