निवडणूक
अशोक कारखाना ४५० कोटी रुपयांनी तोट्यात कसा ? -उत्तर द्या आव्हान

न्यूजसेवा
श्रीरामपूर-(प्रतिनिधी)
अशोक सहकारी साखर कारखाना ४५० कोटी रुपयांनी तोट्यात कसा गेला हे पहिले सांगा मात्र यावर सत्ताधारी भानुदास मुरकुटे आणि मंडळी यावर सविस्तर मौन पाळले जात असून कौटुंबिक विषयावर लक्ष वळवले जात असल्याची टीका क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले यांनी केली आहे.
“शेतकरी संघटनेकडे आर्थिक ताकद नाही पण बौद्धिक पातळीवर तुम्ही आमने-सामने या व वादविवाद करा व जनतेसमोर तथ्य आणि सत्य येईल.आज तूम्ही कारखाण्याची स्थिती चांगली नाही असा दावा करतात.मग पस्तीस वर्ष कारखाना कोणाच्या ताब्यात होता याचे सत्ताधारी मंडळींनी उत्तर द्यायला हवे”-अड.अजित काळे,उपाध्यक्ष शेतकरी संघटना.
श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कामधेनू म्हणून महत्वपूर्ण असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक येत्या रविवार दि.१६ जानेवारी रोजी संपन्न होत असून त्यासाठी सत्ताधारी मुरकुटे गटाच्या विरुद्ध शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध मोठे आव्हान निर्माण केले आहे.त्यामुळे प्रचार सभांना वेग आला आहे.त्यासाठी नुकतेच बेल पिंपळगाव येथे सकाळी ९.३०वाजेच्या सुमारास प्रचार बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी दिलीप शिंदे हे होते.
सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड.अजित काळे,श्रीरामपूरचे ,प्रदेश राष्ट्रवादी सरचिटणीस अविनाश आदिक,क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले,ज्ञानेश्वर मुरकुटे,पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते,श्रीरामपूर नगरपरिषद अध्यक्षा अनुराधा आदिक,अड.सर्जेराव घोडे,उमेदवार वंदना मुरकुटे,अर्चना उंडे,अर्चना पानसरे,दिलीप पवार,विष्णू खंडांगळे,नानासाहेब गवारे,शिवाजी शेजुळ,निलेश आदीक,शांताबाई जाधव,साठे सर,नितीन पटारे आदी मान्यवरांसह बहुसंख्य शेतकरी सभासद उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”श्रीरामपूर तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखाण्याची निवडणूक हि शेतकरी हितासाठी लढवली जात आहे.इथेनॉल जास्त काढण्यासाठी साखर उतारा कमी होतो.मात्र ही मंडळी सांगत नाही.इथेनॉल उचलल्यावर एकवीस दिवसात देयके देणे गरजेचे आहे.मात्र तसे होत नाही.तुम्ही ऊस त्यांच्यासाठी पिकवता की,या चोर नेत्यांसाठी पिकवता असा सवाल करून उपस्थित सभासदांना कापबशीला शिक्का मारण्याचे आवाहन केले आहे.
सदर प्रसंगी अड.अजित काळे यांनी आपल्या शेतकरी संघटनेकडे आर्थिक ताकद नाही पण बौद्धिक पातळीवर तुम्ही आमने-सामने या व वादविवाद करा व जनतेसमोर तथ्य आणि सत्य येईल.आज तूम्ही कारखाण्याची स्थिती चांगली नाही असा दावा करतात.मग पस्तीस वर्ष कारखाना कोणाच्या ताब्यात होता याचे सत्ताधारी मंडळींनी उत्तर द्यायला हवा.आमच्या उमेदवारांना कृषी क्षेत्रातील पदवीधर आहेत.त्यांच्या मार्फत आम्ही यशस्वी कारखाना चालवून दाखवू असे थेट आव्हान दिले आहे.कारखाना सातत्याने तोट्यात का चालला आहे.या कार्यक्षेत्रात असलेला विषय बाहेरच्या कारखान्याकडे का जातो याचे उत्तर देणें गरजेचे आहे.आगामी काळात शेतकऱ्यांच्या विकासासाठी तुमच्याकडे दृष्टी नाही म्हणून यांचेकडून आगामी काळात कारखाना सभासदांनी काढून घ्यावा असे आवाहन केले आहे.२०१३ ला कायदा ७०-३०चा फॉर्म्युला आणला तर त्यातून शेतकऱ्यांना ७०टक्के रक्कम मिळायला हवी होती.
सदर प्रसंगी प्रास्तविक प्रा.कार्लस साठे यांनी केले त्यांनी भानुदास मुरकुटे यांचा पक्ष कोणता आहे हे जाहीर करावे,जे माजी आ.ससाणे यांच्या मौतीला गेले नाही दशक्रियेला गेले नाही की वर्षस्राधाला गेले नाही आणि आज म्हणतात आम्ही करण नवले पाण्यासाठी एकत्र आलो असल्याचा कांगावा करत आहे.अन्य कारखान्यांना उपपदार्थ निर्मिती असल्याचे सांगतात.व भाव देण्यास टाळाटाळ करतात असा आरोप त्यांनी शेवटी केला आहे.
तर उपस्थितांना अविनाश आदिक,ज्ञानेश्वर मुरकुटे,आदींनी मार्गदर्शन केले आहे.यावेळी विष्णू खंडांगळे यांनीआपल्या सविस्तर भाषणात कारखान्यातील गैरप्रकार निदर्शनास आणले आहे.नितीन पटारे,ज्ञानेश्वर मुरकुटे,आदींनी मार्गदर्शन केले आहे.
तर सदर प्रसंगी अविनाश आदिक,पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते,अड.सर्जेराव घोडे,यांनी मार्गदर्शन केले आहे.सूत्रसंचलन कार्लस साठे यांनी केले तर उपस्थितांचे आभार दिलीप पवार यांनी मानले आहे.