जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव तालुक्यातील ग्रां.पं.च्या पोट निवडणुकीत…गटाचा झेंडा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या घारी,मोर्वीस ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत आ.आशुतोष काळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारांनी आपला झेंडा फडकवला आहे.त्यांचे घारी व मोर्विस परिसरात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोपरगाव तालुक्यातील घारी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य शांतीलाल पवार यांचे निधन झाल्यामुळे व मोर्वीस ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या रिक्त असलेल्या जागेसाठी दोनही ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडली आहे त्यात दोन्ही जागी आ.काळे गटाच्या सदस्यांनी बाजी मारली आहे.हि कोल्हे गटाला चपराक मानली जात आहे.

कोपरगाव तालुक्यातील घारी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य शांतीलाल पवार यांचे निधन झाल्यामुळे व मोर्वीस ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या रिक्त असलेल्या जागेसाठी दोनही ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडली आहे.श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या पोट निवडणुकीत सुजान मतदारांनी घारी ग्रामपंचायत मध्ये संदीप रंगनाथ पवार व मोर्विस येथील सविता जनार्दन पारखे या काळे गटाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिले आहे. विजयी उमेदवारांचे माजी आ.काळे,आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.

सदर प्रसंगी घारीचे सरपंच रामदास जाधव,उपसरपंच ठकुबाई काटकर,शिवाजी जाधव,सर्जेराव सोनवणे,प्रभाकर आहिरे,शंकरराव सोनवणे,संतोष पगारे,निलेश वाघ,सिताराम वाघ,सिताराम जाधव,नामदेव जाधव,सुभाष पारखे,अक्षय सोनवणे,जनार्दन पारखे,प्रकाश सोनवणे,भगवंत सोनवणे,गोरक्षनाथ पारखे,राहुल पारखे,कमलाकर जाधव,लक्ष्मण पवार,किरण पवार,कांतीलाल पवार,हरीलाल पवार,हुसेन पठाण,दादा पठाण,रफिक पठाण,शिवाजी बर्डे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close