जाहिरात-9423439946
निवडणूक

जवळके ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी थोरात यांची निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत इमारतीच्या संपन्न होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमास विश्वासात न घेतल्याच्या कारणावरून जवळके ग्रामपंचायतच्या महिला उपसरपंच मंदाबाई थोरात यांनी नुकताच राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक आज संपन्न झाली असून त्या जागी सत्यशोधक पॅनलचे सदस्य विजय साहेबराव थोरात यांची बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामविकास अधिकारी जयश्री शेलार यांनी जाहीर केले आहे.या निवडीचे कार्यकर्त्यानी फटाके फोडून व पेढे वाटून स्वागत केले आहे.

जवळके या ग्रामपंचायतीची साडेतीन वर्षांपूर्वी निवडणूक संपन्न झाली होती त्या नंतर एप्रिल महिन्यात त्यांच्या विरोधात सहा सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता.त्यात मात्र त्यावेळी केवळ सदरचे सरपंचपद हे इतर मागासप्रवर्ग यासाठी आरक्षित असल्याने केवळ तांत्रिक कारणाने वाचले होते.मात्र या सरपंच थोरात हे अल्पमतात आले होते.त्यानंतर आमदार काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे भूमिपूजन आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमास आम्हाला विश्वासात घेतले नाही या कारणावरून तत्कालीन उपसरपंच मंदाबाई थोरात यांनी राजीनामा दिल्याने हि जागा रिक्त झाली होती.त्या जागेची निवडणूक निवडणूक अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी जयश्री शेलार यांनी आज निवडणूक जाहीर केली होती.त्या निवडणुकीत आज सकाळी साडे दहा ते साडे अकरा वाजे पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत होती.त्यावेळी सत्यशोधक पॅनलचे सदस्य विजय थोरात यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी जयश्री शेलार यांनी ते बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले आहे.उपसरपंच विजय थोरात यांना अन्य सदस्य तथा माजी उपसरपंच मंदाबाई थोरात,प्रकाश थोरात,मालती थोरात,व कविता थोरात यांनी पाठिंबा दिला होता.

या निवडीचे सत्यशोधक पॅनलचे संस्थापक नानासाहेब जवरे,माजी सरपंच वसंत थोरात,बंडोपंत थोरात,सोसायटीचे माजी उपाध्यक्ष व जेष्ठ नेते विश्वनाथ थोरात,रामनाथ थोरात,दत्तात्रय थोरात,राजेंद्र थोरात,सोपान थोरात,नवनाथ शिंदे,अशोक शिंदे,परशराम शिंदे,बाळासाहेब थोरात,रावसाहेब थोरात,डी.के.थोरात,सुधाकर थोरात,जनमंगल संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव थोरात,वाल्मिक भोसले,बाबूराव थोरात,गोरक्षनाथ शिंदे,महेश थोरात,नवनाथ थोरात,एकनाथ थोरात,नवनाथ पन्हाळे,काशिनाथ शिंदे,विश्वनाथ शिंदे,सुखदेव थोरात,गोरखनाथ थोरात,गोविंद थोरात,सुनील थोरात,अण्णासाहेब शिंदे,जालिंदर शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close