निवडणूक
कोपरगावातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील नुकत्याच निवडणूक संपन्न झालेल्या २९ ग्रामपंचायतीसह तालुक्यातील सर्व म्हणजेच ७५ ग्रामपंचायतीचे आरक्षण आज प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या उपस्थितीत तहसीलदार योगेश चंद्रे यांनी जाहीर केले असून ते खालील प्रमाणे दिसून येत आहे.
राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले होते.त्यामुळे आता विजयी उमेदवारांना सरपंचपदाचे वेध लागले होते.राज्य सरकारने यापूर्वीच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडती रद्द केल्यामुळे नव्याने सोडती होणार होत्या.मतदानाच्या दिवसानंतर पुढील ३० दिवसांमध्ये म्हणजे १५ फेब्रुवारीपर्यंत सरपंच आणि उपसरपंचपदांच्या निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले होते.त्यामुळे आता विजयी उमेदवारांना सरपंचपदाचे वेध लागले होते.राज्य सरकारने यापूर्वीच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडती रद्द केल्यामुळे नव्याने सोडती होणार होत्या.मतदानाच्या दिवसानंतर पुढील ३० दिवसांमध्ये म्हणजे १५ फेब्रुवारीपर्यंत सरपंच आणि उपसरपंचपदांच्या निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते त्यामुळे या आरक्षण सोडतीकडे राज्यातील सरपंच पदाचे उमेदवार लक्ष ठेवून होते.कोपरगाव तालुक्यातील नुकत्याच संपन्न झालेल्या २९ ग्रामपंचायती त्याला अपवाद नव्हत्या.
कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीचे सन २०२० ते २०२५ या कालावधीकरिता सरपंचपद आरक्षण प्रक्रीया उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार योगेश चंद्रे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली आहे.तहसिल कार्यालय कोपरगाव येथील सभागृहात सरपंच पद आरक्षण प्रक्रीया संपन्न झाली.सुरुवातीला कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या गत २५ वर्षातील आरक्षण उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांना निदर्शनास आणून दिले.त्या नंतर निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक तत्त्वानुसार अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,नागरिकांचा मागास प्रवर्ग,सर्वसाधारण,अनुसूचित जाती स्री राखीव,अनुसूचित जमाती स्री राखीव,नागरीकांचा मागास प्रवर्ग,सर्वसाधारण स्री राखीव या प्रमाणे आरक्षण सोडत करण्यात आली.आरक्षण सोडत मध्ये चिठ्ठी पध्दतीचा अवलंब करण्यात आला.यात शर्विल कुणाल बाविस्कर या सहा वर्षाच्या मुलाचे हस्ते सोडत चिठ्ठी काढण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने त्या ग्रामपंचायतीचे आरक्षण आज जाहीर केले आहे.ते पुढील प्रमाणे-
अनुसूचित जाती राखीव -शिंगणापूर, मंजूर,माहेगांव देवी,डाऊच बुद्रुक,कारवाडी
अनुसूचित जाती स्री राखीव -तिळवणी,माहेगांव देशमुख,कोकमठाण,चासनळी,मढी खुर्द
अनुसूचित जमाती -रवंदे,कासली, दहेगांव बोलका, जेऊर-कुंभारी,कान्हेगांव
अनुसूचित जमाती स्री राखीव-देर्डे-कोर्हाळे, शहाजापूर, पोहेगांव बुद्रुक-पोहेगांव खुर्द,ओगदी,वेस-सोयगाव,येसगांव
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.म.प्र.)-सांगवीभुसार,कोळगाव थंडी,हंडेवाडी,करंजी बुद्रुक,अंचलगांव,मुर्शतपुर,लौकी,देर्डे-चांदवड,मनेगांव,चांदेकसारे
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.म.प्र.) स्रीयांकरिता राखीव -मोर्विस,कोळपेवाडी,चांदगव्हाण, आपेगाव,गोधेगांव,घोयेगांव,सडे,डाऊच खुर्द, शहापूर, रांजणगाव देशमुख
सर्वसाधारण-धामोरी,ब्राम्हणगांव, टाकळी,मढी बुद्रुक,बहादरपुर,घारी, काकडी-मल्हारवाडी, वडगांव,नाटेगांव, धोत्रे,धोंडेवाडी,सोनारी,हिंगणी,खिर्डी गणेश, शिरसगाव-सावळगांव,भोजडे,बोलकी
सर्वसाधारण स्री राखीव -मळेगांव थडी, कुंभारी, सुरेगांव, वेळापूर,बक्तरपुर,धारणगांव,जेऊर पाटोदा,उक्कडगांव,पढेगांव, तळेगाव मळे,वारी,खोपडी,सोनेवाडी,बहादराबाद,जवळके,संवत्सर,अंजनापूर
सरपंच पद सोडतीची प्रक्रीया पारदर्शक पणे होणेकरिता या सोडतीचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांसाठी करण्यात आले होते.कोपरगांव तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.या आरक्षणानंतर आता गावागावातील राजकीय खेळीच्या गणितांना आता वेग येणार आहे.