जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

नवीन मतदारांनी आपली नावनोंदणी करावी-आवाहन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांचेकडून दि. ०१ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्‍त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश मतदानापासून वंचित राहिलेल्‍या मतदारांना आणि नवीन मतदार म्‍हणून पात्र असलेल्‍या मतदारांना संधी देणे तसेच नाव नोंदणी वाढविणे व चुका विरहित मतदार याद्या तयार करण्यात येणार असून नावमातदारांनीं या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रभाग क्रमांकाचे नगरसेवक जनार्दन कदम यांनी केले आहे.

ज्या व्यक्तीचे दि. ०१ जानेवारी २०२१ रोजी वय १८ वर्ष पूर्ण होत आहे.परंतु मतदार यादित नांव नाही,अशा व्यक्तीने आपले नांव मतदार यादीत समाविष्ट करुन घेणेसाठी फॉर्म नमुना-६ भरुन द्यावा. ज्या मतदाराच्या मतदार यादितील तपशिलात (नांव,वय,लिंग,फोटो) इ.मध्ये काही चुका असल्यास त्या दुरुस्त करुन घेणेसाठी फॉर्म नमुना-८ भरुन द्यावा-जनार्दन कदम,नगरसेवक कोपरगाव नगरपरिषद.

सदर मतदार याद्या पुन:रिक्षण कार्यक्रम दि.३० सप्‍टेंबर २०२० पासून राबविला जात असून तो १५ जानेवारी २०२१ पर्यंत राबविला जाणार आहे.मतदार यादी विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक १७ नोव्‍हेबर रोजी एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.नवमतदारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे
मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाली असून प्रत्येक मतदाराने प्रारुप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही, याची खात्री करावी.मतदार यादीत नाव नसल्यास त्यासाठी आपला फॉर्म नमुना-६ म्हणजेच मतदार नांव नोंदणीसाठी आवश्यक नमुना फॉर्म भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्रात जमा करावा. ज्या व्यक्तीचे दि. ०१ जानेवारी २०२१ रोजी वय १८ वर्ष पूर्ण होत आहे.परंतु मतदार यादित नांव नाही,अशा व्यक्तीने आपले नांव मतदार यादीत समाविष्ट करुन घेणेसाठी फॉर्म नमुना-६ भरुन द्यावा. ज्या मतदाराच्या मतदार यादितील तपशिलात (नांव,वय,लिंग,फोटो) इ.मध्ये काही चुका असल्यास त्या दुरुस्त करुन घेणेसाठी फॉर्म नमुना-८ भरुन द्यावा.कुंटुंबातील एखादी व्यक्ती मयत झाली असल्यास त्या व्यक्तीचे नांव मतदार यादिमधून वगळण्यासाठी मृत्युच्या दाखल्यासह फॉर्म नमुना-७ भरुन द्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
दिनांक ०१ जानेवारी २०२१ रोजी १८ वर्ष पूर्ण झाले आहे, परंतु मतदार यादित नांव नाही अशा विद्यार्थांची नांव नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन नगरसेवक जनार्दन कदम यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close