गुन्हे विषयक
किरकोळ कारणावरून जीवे मारण्याची धमकी,कोपरगावात गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे आज शनिवार दि.०७ मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्याच गावातील आरोपी ज्ञानेश्वर भाऊसाहेब भारती,नवनाथ भाऊसाहेब भारती,संतोष भाऊसाहेब भारती आदींनी फिर्यादीचे पती चाँदखां हे घरी असताना त्यांच्या घरासमोर येऊन फिर्यादी व तिचे पती यांना शिवीगाळ करून ‘तू’,”जर आमच्या नादी लागला तर तुला जीवे ठार मारू” अशी धमकी दिली आहे.या प्रकरणी फिर्यादी रुकसाना चाँदखां पठाण यांनी भयभीत होऊन कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने करंजी व परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महिला रुकसाना पठाण व आरोपी ज्ञानेश्वर भारती हे एकाच गावातील रहिवासी आहेत.त्यांच्यात काही किरकोळ कारणावरून आपसात मतभेद आहेत.त्या किरकोळ कारणावरून आरोपी ज्ञानेश्वर भाऊसाहेब भारती सह तीन जणांनी घरासमोर जमावाने येऊन त्यांनी फिर्यादीचे पती चाँदखां हे घरी असताना त्यांच्या घरासमोर येऊन फिर्यादी व तिचे पती यांना शिवीगाळ करून ‘तू’,”जर आमच्या नदी लागला तर तुला जीवे ठार मारू” अशी धमकी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महिला रुकसाना पठाण व आरोपी ज्ञानेश्वर भारती हे एकाच गावातील रहिवासी आहेत.त्यांच्यात काही किरकोळ कारणावरून आपसात मतभेद आहेत.त्या किरकोळ कारणावरून आरोपी ज्ञानेश्वर भाऊसाहेब भारती,नवनाथ भाऊसाहेब भारती,संतोष भाऊसाहेब भारती आदी आरोपी घरासमोर जमावाने येऊन त्यांनी फिर्यादीचे पती चाँदखां हे घरी असताना त्यांच्या घरासमोर येऊन फिर्यादी व तिचे पती यांना शिवीगाळ करून ‘तू’,”जर आमच्या नदी लागला तर तुला जीवे ठार मारू” अशी धमकी दिली आहे.या प्रकरणी फिर्यादी रुक्सना चाँद खां पठाण या व तात्यांचे कुटुंब भयभीत झाले होते.
त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर होऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२६३/२०२२ भा.द.वि.कलम ५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.अशोक गवसने हे करीत आहेत.