निवडणूक
…या ग्रामपंचायत उपसरपंच पद निवड जाहीर

न्युजसेवा
कोपरगाव- (प्रतिनिधी)
राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कुंभारी ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली असुन या पदावर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कविता ललित नीलकंठ यांची बिनविरोध निवड झाली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

गतवर्षी कोपरगाव तालुक्यातील गत वर्षी कुंभारीसह पाच ग्रामपंचायतीची निवडणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली होती त्यात सरपंचपदी देवयानी प्रशांत घुले यांची बहुमतासह निवड झाली होती.तर उपसरपंच पदावर दिलीप ठाणगे यांची निवड झाली होती.तथापि उपसरपंच दिलीप ठाणगे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती.त्याची निवडणूक सरपंच घुले यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यात ही निवड झाली आहे.ही ग्रामपंचायत माजी सरपंच प्रशांत घुले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे.

यावेळी कविता ललित निळकंठ त्यांच्या नावाची सूचना वैशाली सुभाष बढे यांनी मांडली एकच अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे ग्रामपंचायत विकास अधिकारी रतन कहार यांनी जाहीर केले.
यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य वैशाली सुभाष बढे,रंजना संजय वारुळे,मनीषा सागर घुले,राहुल विश्वनाथ पवार,रामराव दगू चंदनशिव,रंजनाबाई सिताराम गायकवाड, ज्योती सचिन अहिरे,अनिकेत हिरामण कदम, तसेच तंटामुक्ती अध्यक्ष शंकर साहदू शेळके, माजी मुख्याध्यापक श्रीकृष्ण पैठणे,तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते,त्र्यंबक वाघ,अर्जुन घुले,पोपटराव निळकंठ,रामदास पवार,भानुदास घुले,राजेंद्र निळकंठ,अशोक निळकंठ,गोपीनाथ निळकंठ, वाल्मीक कदम,वाल्मिक कदम,बापु वारूळे, पुरुषोत्तम महाजन,सोमनाथ निळकंठ,अशोक वाघ तसेच युवा कार्यकर्ते सिध्दांत शिवाजी घुले,अभिजीत चकोर,संदीप निळकंठ,आदित्य महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.