जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

शिक्षक मतदार संघ निवडणूक,दोन गटात वाद,पोलिसांचा हस्तक्षेप !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
  

   नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक निर्णयाक टप्प्यात पोहचली असून आज नामनिर्देशन भरण्याचा शेवटचा दिवस असताना नाशिक येथे आज अकल्पनीय घटना घडली असून कोल्हे गटाने विद्यमान आ.किशोर दराडे यांचे नामसाधर्म्य असलेला उमेदवार शोधून त्याचे नामनिर्देशन दाखल केले असल्याची माहीती आली असून त्यामुळे आ.दराडे यांचे पित्त खवळले असून त्यांच्यात व अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात बाचाबाची व मारहाण झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली असून नाशिक येथे पोलीस ठाण्यात थेट हा तमाशा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची खबर हाती आली असूनआज सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास दराडे यांची कार्यकर्ते कोपरगाव येथे नामसाधर्म्य असलेल्या इसमास धमकावण्यास आले असल्याची विश्वसनिय माहिती हाती आली आहे.त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

  

  विविध निवडणुकीत संभाव्य विजयी उमेदवारांचे मताधिक्य घटविण्यासाठी व आपले घोडे पुढे दामटण्यासाठी विरोधक नामी संधी शोधत असतात.त्यात नामसाधर्म्य असलेल्या व्यक्ती अथवा तत्सम पक्ष चिन्ह देऊन समोरच्या उमेदवाराचे मताधिक्य घटविण्याचे काम विरोधक करत असतात.अशीच घटना नाशिक शिक्षक मतदार संघात उघडकीस आली आहे.त्यामुळे कोल्हे व आ.दराडे या दोन गटात तुंबळ हाणामारी निर्माण झाला असून तो थेट नाशिक पोलिसांत पोहचला असल्याची माहिती आहे.

  नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून निवडणुकीसाठी दि.२६ जून रोजी मतदान आणि ०१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.दि.३१ मे रोजी भाजप नेते विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर काँग्रेसचे नेते आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक अ‍ॅड.संदीप गुळवे यांनीही काँग्रेसमधून थेट शिवसेना(उबाठा) गटात प्रवेश करत नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दंड थोपटले आहे.त्यामुळे हा सामना दिवसेंदिवस रंगत चालला असल्याचे दिसून येत आहे.या आधीच शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे,टि.डी.एफ.चे उमेद्वार प्रा.भाऊसाहेब कचरे,नाशिकचे अ‍ॅड.संदीप गुळवे,धुळे येथील निशांत रंधे,नगरचे आप्पासाहेब शिंदे,दत्तात्रय पानसरे आदी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे.आज शेवटचा दिवस असल्याने रंजक घटना घडून आली आहे.


  

दरम्यान कोपरगाव येथील या नाव साधर्म्य असलेला किशोर दराडे या इसमास नोकरी अथवा तत्सम फायदा दाखवून आपले नामनिर्देशन मागे घेण्यासाठी दबाव आणला जत असल्याची माहिती आहे.मात्र त्याने त्यास नकार दिला असल्याची माहिती आहे. 

  विविध निवडणुकीत संभाव्य विजयी उमेदवारांचे मताधिक्य घटविण्यासाठी विरोधक नामी संधी शोधत असतात.त्यात नामसाधर्म्य असलेल्या व्यक्ती अथवा तत्सम पक्ष चिन्ह देऊन समोरच्या उमेदवाराचे मताधिक्य घटविण्याचे काम विरोधक करत असतात.अशाच घटना नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत घडल्या असून खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे नामसाधर्म्य असलेल्या व्यक्तीने १४ हजाराहून अधिक मते घटवली असल्याचे उघड झाले आहे.अशीच घटना नगर दक्षिण मतदार संघात घडली असून निलेश लंके नामक दुसरी व्यक्ती व तत्सम चिन्ह असलेली उभी करून त्यास ४४ हजारहून मोठे मताधिक्य मिळवले असल्या डाव उघड झाला आहे.अशीच घटना नाशिक येथे उघड झाली आहे.अशाच घटनेची पुनरावृत्ती नाशिक शिक्षक मतदार संघात घडविण्याचे घटना आज नाशिक येथे उघड झाली आहे.

  सदर इसम हा कोपरगाव येथील असल्याची माहिती आहे.ही खबर दराडे यांना व त्यांच्या कार्यकर्त्याना मिळताच त्यांची व अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांची नाशिक येथे निवडणूक कार्यालयात भेट घेऊन त्याचे रूपांतरण बाचाबाची नंतर हाणामारी होण्यात झाली असल्याचे उघड झाले आहे.एवढेच नाही तर हा शिमगा थेट नाशिक रोड पोलीस ठाण्यात पोहचला असल्याची माहिती हाती आली आहे.
दरम्यान कोपरगाव येथील रहिवासी असलेला सदर उमेदवार हा घरी आला असता या ठिकाणी आ.दराडे व विवेक कोल्हे यांचे कार्यकर्ते डॉ.अज़ेय गर्जे यांच्या रुग्णालयासमोर आमने-सामने आले होते.दोन्हीही डॉ.गर्जे यांचे नातेवाईक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांनी यात मध्यस्ती केल्याची माहिती हाती आली आहे.मात्र त्यांना यात यश आले नाही.अखेर यात कोपरगाव शहर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे सुरुवातीस या निवडणुकीत रंग भरू लागला असून शेवट कसा होणार याकडे नाशिक विभागातील मतदारांचे लक्ष लागून आहे.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close