जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

स्वीप समितीचे उपक्रम देश व राज्याला अनुकरणीय-अजमेरा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

अ.नगर (प्रतिनिधी) –


    स्वीपच्या मतदार जनजागृती उपक्रमांना देशभक्तीचा सुगंध असला पाहिजे.या माध्यमातूनच भारतीय मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे.भारत निवडणूक आयोगाने स्वीपच्या विविधांगी व नाविन्यपूर्ण उपक्रमांवर सतत भर दिला आहे.अ.नगर स्वीप समितीचे नावीन्यपूर्ण व नवसंकल्पना असलेले उपक्रम हे निश्चितच  देशाला व राज्याला अनुकरणीय आहेत.यातील काही उपक्रम देश व राज्य स्तरावर राबवण्याबाबत आम्ही विचाराधीन असल्याचे प्रतिपादन संतोष अजमेरा संचालक स्वीप भारत निवडणूक आयोग यांनी नगर येथे एक कार्यक्रमात बोलताना केले आहे.


          

“तंत्रज्ञानाचा चपखल वापर करून अ.नगर स्वीप समितीने AR- augmented reality ,VR -virtual reality सारख्या आभासी तंत्रज्ञानाच्या संकल्पना निवडणूक प्रक्रियेत आणलेल्या आहेत ही स्वीपच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.याचे अनुकरण समस्त राज्याने अथवा देशाने करावे”-किरण कुलकर्णी,अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र.

भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी,पुणे येथे संपन्न झालेल्या स्वीप नोडल अधिकारी राज्यस्तरीय परिषद व प्रशिक्षण कार्यशाळेत समारोपाप्रसंगी श्री अजमेरा बोलत होते.

सदर प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आराधना शर्मा,वरिष्ठ सल्लागार स्वीप,एस.चोक्कलिंगम मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य,किरण कुलकर्णी,अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी,शरद दळवी-उप मुख्य निवडणूक अधिकारी,डॉ.सुहास दिवसे -जिल्हा निवडणूक अधिकारी-पुणे,अशोक कडूस-स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी,अ.नगर आदी उपस्थित होते.
     “तंत्रज्ञानाचा चपखल वापर करून अ.नगर स्वीप समितीने AR- augmented reality ,VR -virtual reality सारख्या आभासी तंत्रज्ञानाच्या संकल्पना निवडणूक प्रक्रियेत आणलेल्या आहेत ही स्वीपच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.याचे अनुकरण समस्त राज्याने अथवा देशाने करावे असे प्रतिपादन किरण कुलकर्णी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी केले.

           सुमारे ३५ जिल्ह्यांमधून अहमदनगर जिल्ह्याला आपले स्वीप उपक्रम मांडण्याची संधी या कार्यशाळेत मिळाली.श्री कडूस यांनी अहमदनगर स्वीप समितीचे सुमारे २५ वैशिष्टयपूर्ण उपक्रम भारत निवडणूक आयोगाच्या व मुख्यनिवडणूक अधिकारी-महाराष्ट्र यांच्या महत्वाच्या अधिकाऱ्यांसमोर प्रस्तुत केले.राज्यभरातून आलेल्या स्वीप नोडल अधिकारी व अ.नगर स्वीप चे अनुकरण करण्याचे आवाहन आयोगाच्या अधिकाऱ्यांना केले.यावेळी अशोक कडूस यांचे विशेष कौतुक करण्यात आले.नगर जिल्हा मतदारदूत डॉ.अमोल बागूल यांनी उपक्रमांची पी.पी.टी. प्रस्तुत केली..SVEEP-स्वीप या शब्दाचा Systematic Voter’s Education and Electoral Participation म्हणजेच पद्धतशीर मतदारांचे शिक्षण आणि निवडणूक सहभाग असा अर्थ होतो.
             जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,अ.नगर सिद्धाराम सालीमठ,राहुल पाटील उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी,प्रदीप पाटील तहसीलदार-निवडणूक,स्वीप समिती सदस्य बाळासाहेब बुगे उपशिक्षणाधिकारी जि.प.अहमदनगर,नायब तहसीलदार प्रशांत गोसावी,जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा निवडणूक शाखा, जि.प.शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनातून राबवण्यात आलेले सेल्फी फोटोंची जागतिक विश्वविक्रम संकल्पना,लोकशाहीचा जागर,स्टाफ लोकशाहीचा,भारतातील पहिला स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक, सोशल मीडियाचा वापर,माझी लोकशाही-माझा फळा शिक्षकांसाठी फलकलेखन स्पर्धा,स्वीप टीव्ही आदी विविध उपक्रमांमुळे मतदार जनजागृती होऊन मतदानाची टक्केवारी वृद्धिंगत होण्यासाठी स्वीप समितीने केलेले प्रयत्न आदी उपक्रमांचा मान्यवरांनी गौरव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close