जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

धर्माच्या नावावर आचार संहितेची ऐसी तैसी !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

    लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून म्हणजे एखाद्या क्षेत्राची निवडणूक घोषित झाल्यापासून ते ती निवडणूक संपून निकाल बाहेर येईपर्यंत लागू असते.या आचारसंहितेत विविध राजकीय पक्षांनी व निवडणुकीसाठी उभ्या असणाऱ्या उमेदवारांनी कशा प्रकारची वर्तणूक ठेवायची याचे सविस्तर विवरण आहे.या आचारसंहितेचे पालन सर्व राजकीय पक्षांना तसेच उमेदवारांना बंधनकारक असताना कोपरगावात मात्र या आचार सहिंतेची तहसील मैदानात आणि शहरात सत्ताधारी वर्गाकडूनच ऐसीतैसी होताना आढळून आलेली दिसत असून निवडणूक विभागाला आज जाग आलेली  दिसून आली आहे.याबाबत शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

लोकसभा निवडणूक आदर्श आचार संहिता सुरु असल्याने या काळात विविध पक्ष आणि नेत्यांचे छायाचित्र असलेले बॅनर हटविण्याचे काम सुरु असतांना निवडणूक आयोगाचे अधिकारी कोपरगावात दिसत आहे,

  

“कोपरगाव शहरात चांगला धार्मिक कार्यक्रमत आयोजित केल्याबद्दल धन्यवाद देतो पण; आदर्श आचारसंहितेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर स्वतःचा फोटो काढून शकतात तर त्यांच्या पेक्षा अन्य कोण मोठा नेता आहे ? असा सवाल करून या कार्यक्रमास स्वतःचे फोटो लावून त्यास स्वतःच गालबोट लावू नये”-विजय वहाडणे,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”भारतात भारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिता अथवा ‘निवडणुकीची आदर्श आचारसंहिता’ किंवा सामान्यपणे ज्यास निवडणुकीची आचारसंहिता असेही संबोधले जाते,ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून म्हणजे एखाद्या क्षेत्राची निवडणूक घोषित झाल्यापासून ते ती निवडणूक संपून निकाल बाहेर येतपर्यंत लागू असते.या आचारसंहितेत विविध राजकीय पक्षांनी व निवडणुकीसाठी उभ्या असणाऱ्या उमेदवारांनी कशा प्रकारची वर्तणूक ठेवायची याचे सविस्तर विवरण आहे.या आचारसंहितेचे पालन सर्व राजकीय पक्षांना तसेच उमेदवारांना बंधनकारक असते.निवडणुकीत सामिल मान्यताप्राप्त अथवा अ-मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या अथवा अपक्ष/स्वतंत्र उमेदवारांनी भाषण,मतदानाचा दिवस,मतदान केंद्र,निवडणुकीचा जाहिरनामा,मिरवणुका,प्रचार,घोषणा व सर्वसामान्य व्यवहार यात काय मर्यादा पाळाव्यात याचे विवेचन केले आहे.निवडणूक आचारसंहिता ही निवडणुका मुक्त व योग्य वातावरणात पार पडाव्यात,त्यात काही जातीय दंगेधोपे अथवा कोणत्याही स्वरूपाचे गैरव्यवहार होऊ नयेत या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.ही आचारसंहिता नीटपणे पाळली जाते कि नाही यावर संबंधीत निवडणूक अधिकाऱ्यांची देखरेख असते.या बाबतचा अहवाल हा संबंधीत निवडणूक अधिकाऱ्यास राज्य निवडणूक आयोग अथवा भारतीय निवडणूक आयोग याकडे पाठवावी लागत असतो.मात्र याला लोकसभा निवडणूक देशात सात टप्प्यात जाहीर केली असताना सत्ताधारी भाजपचे कोपरगावातील नेते अपवाद असल्याचे दिसून आले आहे.त्यात दिवंगत नेत्याच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ धार्मिक कथेचे आयोजन केले असून गावोगाव गाड्या पाठवून मतदारांना जमविण्याचे काम जोरात सुरु आहे.त्याला कोणाची काही हरकत असण्याची शक्यता नाही.मात्र कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि शहरात दिवंगत नेत्यांबरोबर वर्तमान नेत्यांनी आपले आणि आपल्या युवराजांचे मोठे फोटो छापण्याची हौस भागूवन घेतल्याचे दिसून आले आहे.या कार्यक्रमस्थळी गोदाधाम येथील श्री सद्गुरू रामगिरीजी महाराज यांचे छायाचित्र लहान,संख्येने कमी व नेत्यांचे फोटो मोठे अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.त्यावर शहरात उलटउलट चर्चेला उधाण आले आहे.यावर आचार संहिता लागू होऊन तीन दिवस उलटूनही नगरपरिषद मुख्याधिकारी व निवडणूक अधिकारी यांनी विशेष डोळेझाक केली आहे.त्यामुळे अनेक नारिकांनी व राजकीय पक्षांनी त्यास हरकत घेतली आहे.

  

“कोपरगाव तालुक्यात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पक्षपातीपणा करू नये ‘तो’ करायचा असेल तर आ.आशुतोष काळे यांचे विकास कामांचे तालुक्यातील फ्लेक्स आचारसंहितेच्या नावावर झाकली आहेत ते पूर्ववत खुले करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करून दिवंगत नेत्यांच्या कामाचे फ्लेक्स लावायचे असतील तर माजी खा.स्व.शंकरराव काळे यांच्या कार्याचे फ्लेक्स लावण्याची आम्हास परवानगी द्यावी”-सुनिल गंगूले,अध्यक्ष,कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

दरम्यान या बाबत कोपरगाव नगरपरिषद आरोग्य निरीक्षक सुनील आरण आज विघ्नेश्वर चौक ते गुरुद्वारा मार्गावर असलेल्या विविध कमानीवर असलेल्या नेत्यांच्या तीन पिढ्यांचे छायाचित्र आढळून आल्याने त्यावर पांढरे कागद लावून झाकण्याचे काम सुरु केले होते.ते पूर्ण करत आणले असताना तहसील मैदानातील पूर्व कमानीवर झाकले असताना त्या ठिकणी ईशान्य गडावरील स्वीय सहाय्यक व काही कार्यकर्ते आदींनी सदर आरोग्य निरीक्षक यांना घेरून त्यास हरकत घेतली होती.व त्यास आरोग्य निरीक्षक आरण यांनी हा आचार संहितेचा प्रश्न असल्याचे सांगून ते झाकून घ्यावे लागेल असे बजावले होते.मात्र त्यास काहीं कार्यकर्त्यानी आक्षेप घेतला व आपल्या वरिष्ठ नेत्याना त्याची खबर दिली होती.याबाबत बराच वेळ खलबत सुरू होते.मात्र पश्चिम प्रवेश द्वारावर मात्र दुपारी दोन वाजे पर्यंत त्यांच्या छबी झळकत होत्या.त्याचा अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे.मात्र आरण यांचेशी या बाबत माहिती जाणून घेण्यासाठी दूरध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.त्यामुळे त्याबाबतची त्यांची भूमिका समजू शकली नाही.

  दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”आदर्श आचारसंहितेही अंमलबजावणी दि.१६ मार्च पासून सुरू असून गुरुद्वारा मार्गावरील सर्व कमानिवरील नेत्यांचे छायाचित्र झाकले असून कोणालाही याचा भंग करता येणार नाही असे बजावले आहे मात्र दिवंगत नेत्यांचे फ्लेक्स काढता येणे अशक्य असल्याची असहाय्यता व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

   दरम्यान याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांचेशी संर्पक साधला असता त्यांनी या कृतीस जोरदार हरकत घेतली असून निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा करू नये.आ.आशुतोष काळे यांचे विकास कामांचे तालुक्यातील फ्लेक्स आचारसंहितेच्या नावावर झाकली आहेत ते पूर्ववत खुले करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करून दिवंगत नेत्यांच्या कामाचे फ्लेक्स लावायचे असतील तर माजी खा.स्व.शंकरराव काळे यांच्या कार्याचे फ्लेक्स लावण्याची आम्हास परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.त्यामुळे निवडणूक आयोगापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

   याबाबत कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सदर चांगला धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले मात्र आदर्श आचारसंहितेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर स्वतःचा फोटो काढून शकतात तर त्यांच्या पेक्षा अन्य कोण मोठा नेता आहे असा सवाल करून या कार्यक्रमास स्वतःचे फोटो लागून त्यास आयोजक नेत्यांनी स्वतःच गालबोट लावू नये असे आवाहन आयोजकांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close