जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दारू उत्पादन व बंदी

विधानपरिषद निवडणूक,मद्यविक्री बाबत हा निर्णय

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया खुल्या,मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी मतदानाच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई तथा कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामार्फत तशा सूचना दिल्या आहेत. मतदान ३० जानेवारी,२०२३ रोजी पदवीधर मतदार संघासाठी मतदान होणार आहे.

दरम्यान दारू बंद आधी ४८ तास होणार असली तरी निवडणुकीत राजकीय नेते आठवडाभर आधीच आपल्या इमानदार (?) कार्यकर्त्यांकडे सदर माल इमानेइतबारे पोहच करत असतात याबाबत अधिकारी आणि प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.याबाबत कोणीही चकार शब्द काढत नाही हे विशेष !हीच खरी लोकशाही मानायची का असा सवाल या निमित्ताने निर्माण होत आहे.

नियमानुसार मतदानाची वेळ संपण्यापूर्वी ४८ तास अगोदरपासून मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे अनुज्ञप्तीधारकांवर बंधनकारक असणार आहे.

जाहिरात-9423439946

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close