कोपरगाव तालुका
लायन्स क्लब ऑफ कोपरगाव पदाधिकाऱ्यांची निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व या वर्षी ५१ व्या वर्षात पदार्पण करण्याऱ्या लायन्स क्लबच्या २०२१-२२ या वर्षाकरिता लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच जाहीर झाली असून अध्यक्षपदी रामदास थोरे,उपाध्यक्षपदी परेश उदावंत,सचिवपदी अक्षय गिरमे,खजिनदारपदी सुमित भट्टड आदिंची लायन्स क्लब ऑफ कोपरगाव च्या संचालक मंडळावर महत्वपूर्ण निवड झाल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे जेष्ठ संचालक तुलसीदास खुबाणी यांनी आमच्या प्रतीनिधीस दिली आहे.
लायन्स क्लब च्या माध्यमातून मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहे.यामध्ये विशेष करून गरजवंतांना अन्नधान्य वाटप,डायलिसीस सेंटर अशा महत्वपूर्ण उपक्रमांचा समावेश होता.तसेच जयपूर फुट कॅम्प,प्लास्टिक सर्जरी शिबीर,रक्तदान शिबीर,आरोग्य तपासणी शिबीर,मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,बिझनेस एक्स्पो अशा प्रकारचे नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबविले जातात.अध्यक्षपदी निवड झालेले रामदास थोरे यांनी २०१७ साली लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे सचिव म्हणुन पद भूषवित असताना लायन्स क्लबचा ‘बेस्ट सचिव’ या पुरस्काराने सन्मानित आहे. तर २०१९-२० मध्ये लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे उपाध्यक्ष म्हणून पद भूषविले आहेत. तसेच नाशिक, अहमदनगर, पुणे या तिन्ही जिल्हे मिळून निघणाऱ्या ‘सह्याद्री लायन’ मासिकाचे ‘सहसंपादक’ म्हणून काम पाहत आहे. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान लायन्स क्लबला लाभले असून पुढेही फायदा व्हावा अशी इच्छा व्यक्त करण्यात आली.या निवडीबद्दल लायन्स क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह सर्व स्तरातून अभिनंदन केले जात असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे.