जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

लढा यशस्वी करण्यासाठी तरुणांची संघटित शक्ती आवश्यक-अड्.काळे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
निळवंडे कालवा कृती समितीचा,”कालवा पाहणी दौरा” उत्साहात संपन्न

कोणताही सामाजिक लढा यशस्वी करायचा असेल तर त्याला तरुणांची संघटित शक्ती आवश्यक असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी अकोले तालुक्यातील निळवंडे धरणावर आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“या १७ गावातील प्रस्तावित योजनेत शिरापूरचे ८९.६ आणि डीग्रसचे ५३.०५ हेक्टर क्षेत्र लाभक्षेत्रातील वगळता अन्य सर्व गावे हि लाभ क्षेत्राच्या बाहेरील आहे.या पाणी योजनांसाठी त्यांनी आधी ज्या धरणात अतिरिक्त पाणी आहे.अशा बारमाही भंडारदरा धरणाची निवड करायला हवी होती.मात्र भंडारदरा धरणाची बारमाही सिंचन क्षमता केवळ २३ हजार हेक्टर आहे.तर निळवंडे हे आठमाही धरण असून त्याची सिंचन क्षमता आधी ६४ हजार २६० हेक्टर होती.त्यात अकोले तालुक्यातील उच्च स्तरीय पाईप कालव्यावर वाढलेले ०२ हजार ३२८ हे.क्षेत्र व जलाशयावरील उपसा सिंचन योजनांचे अतिरिक्त ०२ हजार २ ९० हे.सिंचन क्षेत्र वाढले आहे.त्यामुळे एकूण सिंचन क्षेत्र वाढून विक्रमी ६८ हजार ८७८ हेक्टरवर जाऊन पोहचले सून या १७ गावांची भर पडून ते ७१ हजार हे.पोहचणार आहे त्यामुळे दुष्काळी शेतकऱ्यांनी सावध होणे गरजेचे बनले आहे”-नानासाहेब जवरे,मार्गदर्शक,निळवंडे कालवा कृती समिती,नगर-नाशिक.

निळवंडे कालव्यांचे काम अंतिम चरणात आले असून त्यासाठी निळवंडे कालवा कृती समीतीने नुकताच पदाधिकारी,कार्यकर्ते आणि शेतकरी यांचा कालवा पाहणी दौरा नूकताच अड्.अजित काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला होता.त्याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.त्यावेळी ते बोलत होते.सदर बैठकीच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ नेते नानासाहेब गाढवे हे होते.

सदर प्रसंगी कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले,माजी उपाध्यक्ष गंगाधर रहाणे,रमेश दिघे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सचिव कैलास गव्हाणे,दत्तात्रय चौधरी,कौसर सय्यद,बाबासाहेब गव्हाणे,उत्तमराव जोंधळे,विठ्लराव देशमुख,संदेश देशमुख,अशोक गांडोळे,संतोष तारगे,रंगनाथ गव्हाणे,भिवराज शिंदे,भाऊसाहेब गव्हाणे,माधव गव्हाणे,रामनाथ ढमाले सर,डॉ.संदीप ढमाले,रामनाथ पाडेकर,तानाजी शिंदे,ज्ञानदेव शिंदे गुरुजी,विक्रम थोरात,माजी सरपंच माणिक दिघे,सचिन मोमले,अमोल साबदे,शशिकांत साबदे,भाऊसाहेब साबदे,आप्पासाहेब कोल्हे,रावसाहेब मासाळ,आनंद भडांगे,के.डी.खालकर,शौकत सय्यद,राजेंद्र नाईक,दत्तात्रय कार्ले,भागवत गायकवाड,गोरक्षनाथ गांडोळे,श्रीकांत माने,शिवाजी कोल्हे,सोमनाथ देवकर,डॉ.दत्तात्रय रहाणे,रवींद्र थोरात,बारकू रहाणे,गोपीनाथ रहाणे,साईनाथ रहाणे महाराज,रोहिदास रहाणे,एन.डी.रहाणे सर,रामनाथ रहाणे सर,कैलास रहाणे,संदीप थोरात,उत्तमराव थोरात,आबासाहेब शिंदे,लक्ष्मण थोरात,विलास पाडेकर,दगडू रहाणे,साहेबराव रहाणे,दत्तात्रय खकाळे,आप्पासाहेब पाडेकर,शिवाजी रहाणे आदी मान्यवरांसह बहु संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

“वर्तमान आघाडी सरकारने निळवंडे कालव्यांसाठी चांगली तरतूद केली आहे.त्या बाबत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,जलसंपदा मंत्री जयंत पाटील,माजी खा.प्रसाद तनपुरे,राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदींचे आभार मानले आहे.मात्र ऊर्ध्व प्रवरा खोऱ्यातील काही मंत्री केवळ बॅनरबाजी करून आपली प्रतिमा काही न करता चमकोगिरी करून उजळविण्याचा प्रयत्न करत असल्याबाबत त्यांनी टीका केली आहे.हे कर्तबगार नेते होते तर या प्रकल्पाला बावन्न वर्ष का लागली ?-अड.अजित काळे,उपाध्यक्ष शेतकरी संघटना,

त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”प्रस्थपितांच्या विरुद्ध संघर्ष सोपा नाही.मात्र तो अशक्यही नाही त्यासाठी संघर्षाची तयारी करायला हवी.निळवंडे कालवा कृती समितीचे पत्रकार नानासाहेब जवरे व अध्यक्ष रुपेंद्र काले व त्यांच्या पदाधिकारी व अन्य सहकाऱ्यांनी ते शिवधनुष्य पेलवून दाखवले आहे.त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातील लढाई जिंकली आहे.त्यावेळी उच्च न्यायालयात राज्य व केंद्र सरकारने हा प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करू असे लेखी प्रतिज्ञा पत्र लिहून त्यासाठी आर्थिक तरतूद करून देऊ असे आश्वासन दिले होते.त्या नुसार वर्षनिहाय राज्य सरकारने तरतूद केली आहे.त्यासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित केला होता.मात्र वर्तमान आघाडी सरकारने चांगली तरतूद केली आहे.त्या बाबत त्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील,माजी खा.प्रसाद तनपुरे,राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदींचे आभार मानले आहे.मात्र ऊर्ध्व प्रवरा खोऱ्यातील काही मंत्री केवळ बॅनरबाजी करून आपली प्रतिमा काही न करता चमकोगिरी करून उजळविण्याचा प्रयत्न करत असल्याबाबत त्यांनी टीका केली आहे.हे कर्तबगार नेते होते तर या प्रकल्पाला बावन्न वर्ष का लागली असा सवाल त्यांनी विचारला आहे.आता हि मंडळी कालवा कृती समितीने मिळवलेले पाणी पळविण्यासाठी डाव टाकत असल्याने ते उघड झाले आहे.त्याची किंमत त्यांना आगामी काळात चुकवावी लागेल असा इशारा शेवटी दिला आहे.

“निळवंडे प्रकल्प उशिरा झाल्याने अनेक शेतकरी आजही आत्महत्या करत आहेत.५२ वर्ष प्रकल्प उशिरा केल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी मुली देत नाही.अनेक जण आपल्या मुलींचे विवाह करू शकत नाही.यांना हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोणी रोखले होते.त्याचे त्यांनी नाव जाहीर करावे असे आवाहन करून या उत्तर जिल्ह्यातील नेत्यांनी केवळ नाटक करून आपल्या सत्तेची पोळी भाजली आहे”-रुपेंद्र काले,अध्यक्ष,निळवंडे कालवा कृती समिती,नगरनाशिक.

सदर प्रसंगी नानासाहेब जवरे यांनी निळवंडे कालव्यांच्या लाभक्षेत्रांबाहेरील गावांना उपसा सिंचन योजनांद्वारे पाणी देण्यासाठी संगमनेर तालुक्यातील १७ गावांसाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यासाठी ०२ कोटी ३७ लाख ३१ हजार रुपयांची आर्थिक तरतूद केल्याबाबत महसूल मंत्र्याविरुद्ध वस्तुस्थिती मांडताना म्हटले आहे की,”या १७ गावातील प्रस्तावित योजनेत शिरापूरचे ८९.६ आणि डीग्रसचे ५३.०५ हेक्टर क्षेत्र लाभक्षेत्रातील वगळता अन्य सर्व गावे हि लाभ क्षेत्राच्या बाहेरील आहे.या पाणी योजनांसाठी त्यांनी आधी ज्या धरणात अतिरिक्त पाणी आहे.अशा बारमाही भंडारदरा धरणाची निवड करायला हवी होती.मात्र भंडारदरा धरणाची बारमाही सिंचन क्षमता केवळ २३ हजार हेक्टर आहे.तर निळवंडे हे आठमाही धरण असून त्याची सिंचन क्षमता आधी ६४ हजार २६० हेक्टर होती.त्यात अकोले तालुक्यातील उच्च स्तरीय पाईप कालव्यावर वाढलेले ०२ हजार ३२८ हे.क्षेत्र व जलाशयावरील उपसा सिंचन योजनांचे अतिरिक्त ०२ हजार २ ९० हे.सिंचन क्षेत्र वाढले आहे.त्यामुळे एकूण सिंचन क्षेत्र वाढून विक्रमी ६८ हजार ८७८ हेक्टरवर जाऊन पोहचले आहे.आता त्यांनी वास्तविक हे सिंचन क्षेत्र वाढीव असून ते म्हाळादेवीं या वाढीव क्षमतेच्या धरणाचे पाणी गृहीत धरून होती.मात्र म्हाळादेवी धरणाला विरोध झाल्याने ते सुमारे एक कि.मी.ऊर्ध्व बाजूस सरकविण्यात आले होते.परिणामस्वरूप आजच्या निळवंडेच्या धरणाची साठवण क्षमता जवळपास त्याची जवळपास दोन ते तीन टी.एम.सी.ने कमी झाली होती.मात्र सिंचन क्षेत्र मात्र म्हाळादेवीचेच राहिले आहे.आजही विहिर सिंचन,तुषार सिंचन धरून हा लाभक्षेत्राचा कसाबसा ताळमेळ बसवला आहे.हि माहिती महसूल मंत्री थोरात यांना माहित आहे.वास्तविक जास्त क्षमता असणाऱ्या धरणाचे पाणी त्यांनी संगमनेर शहर आणि उर्वरित गावे यांना द्यायला हवे हि जास्त व्यावहारिक बाब असताना ती त्यांनी जाणीवपूर्वक टाळली आहे या बाबीकडे लक्ष वेधले आहे.त्यांना या गावांना पाणी द्यायचेच असेल तर त्यांनी जरूर द्यावे आमची काहीही हरकत नाही मात्र त्यांनी ५० वर्षाहून जास्त काळ आमदारकी व चोवीस वर्षाहून अधिक काळ मंत्री पद व ऐका वेळी सात पदे भूषवले आहे.ते पणाला लावून निळवंडे धरणाची उंची वाढवून ते बारमाही करावे आणि शक्य नसेल तर त्यांनी या दुष्काळी जनतेत आगामी निवडणुका पाहून भांडणे लावण्याचे जुने प्रकार सोडून द्यावे असे आवाहन शेवटी केले आहे.

प्रारंभी या मोटार सायकल दौऱ्यास जवळके येथील गणेश मंदिरा पासून प्रारंभ करण्यात आला होता.त्यानंतर तळेगाव दिघे येथील आणखी कार्यकर्ते त्यात सामील होऊन करूले नजीक असललेल्या निळवंडे कालव्याचे कडेने प्रयाण करून दुपारी दोन वाजेच्या सुमारास हि फेरी पोहचली होती.त्या वेळी तेथे सर्व शेतकऱ्यांनी वनभोजन घेतले होते.त्यावेळी दीडशेहुन अधिक दुचाकीस्वार व तीनशेहून अधिक शेतकरी त्यात सामील झाले होते.

अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी निळवंडे धरणामुळे दुष्काळी शेतकरी यांचे प्रपंच कसे उध्वस्त झाले या विवेचन केले आहे.निळवंडे प्रकल्प उशिरा झाल्याने अनेक शेतकरी आजही आत्महत्या करत आहेत.५२ वर्ष प्रकल्प उशिरा केल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी मुली देत नाही.अनेक जण आपल्या मुलींचे विवाह करू शकत नाही.यांना हा प्रकल्प करण्यापासून कोणी रोखले होते.त्याचे त्यांनी नाव जाहीर करावे असे आवाहन करून या उत्तर जिल्ह्यातील नेत्यांनी केवळ नाटक करून आपल्या सत्तेची सोय केली असल्याचा आरोप केला आहे.घुलेवाडी येथील भूसंपादन अद्याप का होऊ शकले नव्हते ? त्याला कोण आडवे आले होते ? व त्यासाठी किती खर्च आला ? असा जाहीर सवाल विचारला आहे.

सदर प्रसंगी रामनाथ ढमाले सर यांनी समितीस ११ हजारांचा तर उत्तमराव जोंधळे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ ०५ हजारांचा धनादेश समितीस प्रदान केला आहे.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी उपाध्यक्ष गंगाधर रहाणे यांनी केले तर उपस्थितांना रमेश दिघे,नानासाहेब गाढवे,दत्तात्रय चौधरी,तानाजी शिंदे सर,ज्ञानदेव शिंदे गुरुजी,ज्ञानेश्वर गव्हाणे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,अड्.योगेश खालकर,उत्तमराव जोंधळे आदींनी मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन साईनाथ रहाणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार बाळासाहेब रहाणे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close