जलसंपदा विभाग
पाटपाण्याचे नियोजन असंवेदनशीलतेमुळे कोलमडले-आरोप

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भंडारदरा धरणाचे शेतीचे आवर्तन सुरू होऊन अठरा दिवस उलटले तरी अद्याप श्रीरामपूर तालुक्यातील जवळपास तीस टक्के सिंचन बाकी असून त्याला जलसंपदा विभागाची असंवेदनशीलता कारणीभूत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकानंव्ये केला आहे.

त्यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे की,” भंडारदरा धरणाचे शेतीचे आवर्तन सुरू होऊन अठरा दिवस उलटले तरी अद्याप श्रीरामपूरचे सत्तर टक्के शेती सिंचन शिल्लक आहे.पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.काळे यांना फोन व्हाट्सअपद्वारे वारंवार शेती पिकाची परिस्थिती कळवूनही त्यांच्याकडून ओझर ते खंडाळा दरम्यानच्या नियमाबाह्य पाणी उपसा नियंत्रणात येत नसल्याचे समोर आले आहे.श्रीरामपूर कालव्याच्या शिर्षस्थस्थानी किमान ४५० क्यूसेक पाणी येणे अपेक्षित असतांना ते शेती आवर्तन सुरु झालेपासून सरासरी ३५० क्यूसेक पाणी मिळाले आहे.अशीच परिस्थिती राहिल्यास श्रीरामपूर तालुक्यातील उर्वरित शेती सिंचन होण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
वास्ताविक श्रीरामपूर उपविभाग व लोणी उपविभागच्या सरहद्दीवर १९८९ च्या शासन निर्णयाद्वारे पाणी मापणाची (गेज मिटर )असणे आवश्यक असतांना तशी व्यवस्था २००० सालापासून अस्तित्वात नसलेचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे.
सदर व्यवस्था अस्तित्वात नसलेने वडाळा उपविभागास बाभळेश्वर येथून पाणी मोजून दिले जाते.या २२ कि.मी.अंतरात उचलेले पाणी वडाळा उपविभागाच्या नावे टाकून अथवा वहन व्यय तूट दाखवली जाते.या बाबींमुळे वडाळा उपविभागाचे सिंचन लांबणीवर अथवा उशिराने होत आहे.पाऊस नसल्याने खरीपातील सोयाबीन सारख्या पिकाच्या फक्त काड्या उभ्या असून यास कार्यकारी अभियंता यांनी वडाळा उपविभागाला कमी दाबाने पाणी पुरवठा केल्यामुळे तालुक्याचे नुकसान झाले आहे.
आज रोजी एन.बी.कॅनॉल चार दिवसापूर्वी शंभर क्यूसेकने सुरु केला असून त्यास दीडशे ते १८० क्यूसेकाने पाणी असल्यास डी.वाय.१,२,३,या चाऱ्याचे पाणी टेलपर्यंत पोहचू शकते.मात्र गेल्या चार दिवसापासून कमी दाबाने पाणी असल्यामुळे पुंच्छ भागात पाणी मिळण्याच्या शक्यता नाही.परंतु कार्यकारी अधिकारी यांच्याकडून पुर्ण दाबाने पाणी न देता शाखाधिकाऱ्यांना व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना,’कारणे दाखवा’ नोटीसा काढून पदाचा गैरवापर करून वडाळा उपविभागाच्या अधिकाऱ्यांना दबाव देण्याचा प्रयत्न होत आहे.यावरून कार्यकारी अभियंता राजकीय दाबवापोटी लोणी पाटबंधारे उपविभागाचा गैर प्रकार झाकणेसाठी हे सर्व करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.हा श्रीरामपूरच्या शेतकऱ्यांवरील अन्याय होत असून हा अन्याय कदापी सहन केला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ श्रीरामपूर शिर्षस्थ भागास किमान ४५० क्यूसेकने कालवा विसर्ग करावा.सन-२०१५ व २०१९ ला अशीच परिस्थिती निर्माण झाली असता शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले होते.त्यावेळीही प्रवरेच्या मंत्र्यांनी श्रीरामपूरच्या शेतकऱ्यावर पदाचा व सत्तेचा गैरवापर करून खोटे खटले भरले तरी हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.होते.व अधीक्षक अभियंता यांनीं श्रीरामपूर शिर्षस्थ भागास तत्काळ पुर्ण दाबाने पाणी सोडण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली आहे.अन्यथा सोमवार दि.०४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता हरेगाव फाटा,नेवासा रोडवर,’बेमुदत रस्ता रोको आंदोलन’ छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.व सदर आंदोलनास अ.नगर जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जबाबदार राहतील असे शेवटी बजावले आहे.