कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात सात व्यायाम शाळांना मंजुरी-..या नेत्यांची माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ०७ गावांसाठी खुली व्यायामशाळा मंजूर करण्यात आल्या असून २० गावांसाठी सौरमिनी हायमॅक्स लॅम्पदेखील मंजूर करण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

जिल्ह्याचे पालक मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे मतदार संघातील अनेक गावांसाठी सौरमिनी हायमॅक्स लॅम्पची मागणी केली होती. त्या मागणीला पालक मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून २० गावांना सौरमिनी हायमॅक्स लॅम्प मंजूर केले आहे.
यामध्ये सोनारी, बक्तरपूर, चासनळी, मायगावदेवी, पोहेगाव, वेस, जेऊर कुंभारी, रांजणगाव देशमुख, भोजडे, लौकी, घोयेगाव, संवत्सर, जेऊर पाटोदा, मुर्शतपूर, हिंगणी, डाऊच बु., ओगदी, अंचलगाव, पढेगाव, सावळगाव आदी गावांचा समावेश आहे. तसेच मतदार संघातील अनेक तरुणांनी व्यायाम शाळेची मागणी केली होती. हि मागणी पूर्ण करण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजने अंतर्गत कासली, तळेगाव मळे, मळेगाव थडी, मायगाव देवी, सांगवी भुसार, वडगाव आणि टाकळी या सात गावांसाठी खुली व्यायाम शाळा मंजूर झाली आहे. अजूनही अनेक गावांची व्यायाम शाळेची व सौरमिनी हायमॅक्स लॅम्पची मागणी असून हि मागणी देखील लवकरच पूर्ण करणार असल्याचे आ.काळे यांनी सांगितले आहे.