जलसंधारण
गावोगाव ‘गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार’ योजना राबवा-आवाहन

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
‘गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार’ योजना हा राज्यातील जलसंधारण प्रकल्प असून यामध्ये धरणे व तलाव गाळमुक्त करुन तो गाळ शेत जमिनीमध्ये टाकण्यात येतो.त्यामुळे जलसाठ्यामध्ये वाढ होते आणि जमिनीची सुपिकताही वाढत असून गेल्या दोन वर्षात राज्यात दीड हजारपेक्षा जास्त जलस्त्रोतातून सुमारे साडेचार कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला असून सुमारे चाळीस हजार शेतकऱ्यांनी हा गाळ वाहून नेला आहे.कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे समन्वयक आदिनाथ पवार यांनी नुकतेच केले आहे.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गाळ मुक्त धरण आणि गाळ युक्त शिवार या योजनेच्या आवाहन बाबत उपस्थितांना चलचित्रफीत दाखविण्यात आली आहे.
राज्यात सध्या सुरू असलेली ‘गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार’ योजना कायमस्वरूपी राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली.यासाठी २६०४ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली असून,यापुढे गाळ वाहतुकीसाठी अनुदान देण्यात येणार आहे.दहा वर्षे जुन्या जलसाठ्यातील गाळ काढण्यासाठी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ आणि ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या दोन्ही योजनांसाठी नवीन धोरणास मान्यताही देण्यात आली असून त्याबाबत भारतीय जैन संघटनेच्या वतीने जन जागृती करण्यात येत आहे.त्याबाबत आज दुपारी ३.३० वाजता एक बैठक कोपरगाव पंचायत समिती सभागृहात सरपंच,ग्रामसेवक यांचे प्रमुख उपस्थितीत आज दुपारी ३.३० वाजता संपन्न झाली आहे त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी,जिल्हा परिषद उपअभियंता दळवी,ग्रामपंचायत विस्तार अधिकारी बबनराव वाघमोडे,प्रशांत तोरवणे,जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष गंगवाल,कनिष्ठ अभियंता आश्विन वाघ,आदींसह तालुक्यातील बहुसंख्य सरपंच,ग्रामपंचायत अधिकारी आदी उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”एकरी १५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.यात विधवा,अपंग महिला,आत्महत्याग्रस्त शेतकरी घेऊ शकणार आहे.या योजनेमध्ये भारतीय जैन संघटना सक्रीय सहभागी होत असल्यामुळे राज्यातील पाण्याची उपलब्धता वाढवण्यासोबतच जमिनीची सुपिकता वाढून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्येही चांगली वाढ होण्यात मदत होणार आहे.तसेच या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मृद व जलसंधारण विभागाने भारतीय जैन संघटनेला सर्वते सहकार्य करावे.‘गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार’ योजना हा राज्यातील जलसंधारण प्रकल्प आहे.यामध्ये धरणे व तलाव गाळमुक्त करुन तो गाळ शेत जमिनीमध्ये टाकण्यात येतो. त्यामुळे जलसाठ्यामध्ये वाढ होते आणि जमिनीची सुपिकताही वाढत आहे.गेल्या दोन वर्षात राज्यात दीड हजारपेक्षा जास्त जलस्त्रोतातून सुमारे साडेचार कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला असून सुमारे चाळीस हजार शेतकऱ्यांनी हा गाळ वाहून नेला आहे.राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये सुमारे ९ कोटी घनमीटर गाळ उपसण्याची क्षमता असून १.८ लाखांहून अधिक शेतकरी गाळ वाहून नेणार आहेत.या योजनेतर्गंत गाळ उपसण्याकरिता आवश्यक असलेली यंत्रसामुग्री व इंधनावरील खर्च दोन्ही मिळून रु.३१ प्रति घ.मी. यानुसार व गाळ वाहून नेण्यासाठी अत्यल्प वअल्पभूधारक शेतक-यांना एकरी १५ हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधी मधून देण्यात येणार असल्याची माहिती देऊन उपस्थितांना सदर मागणी अर्ज ऑनलाईन कसा भरावा याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे.या योजनेबाबत कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन पवार यांनी शेवटी केले आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी केले आहे तर सूत्रसंचालन आश्विन वाघ यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार तालुका जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष गंगवाल यांनी मानले आहे.