जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जयंती,पुण्यतिथी अभिवादन

महात्मा फुले यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याची गरज-प्रा.डॉ.नवसागर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

अ.नगर (प्रतिनिधी)

“क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांनी बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त केले.स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले.समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा, अस्पृश्यता,अनिष्ट रुढी-परंपरांवर हल्ला करुन प्रबोधनाची चळवळ उभारली.त्यांचे अलौकिक कार्य आणि विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याची गरज आहे असे मत संभाजीनगरच्या मिलिंद महाविद्यालयाचे प्रा.डॉ.सुधाकर नवसागर यांनी आज येथे व्यक्त केले.

“महात्मा फुले यांनी शेतकरी,कष्टकरी,महिला,दुर्बल,वंचित,उपेक्षित बांधवांना हक्कांची जाणीव करुन देत लढण्याचे बळही दिले.छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली.देशाला पुढे नेणारा,राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्रांती घडवून आणणारा विज्ञानवादी,सत्यशोधक विचार त्यांनी दिला”-प्रा.डॉ.नवसागर,मिलिंद महाविद्यालय.

अहमदनगर समाज कल्याण विभागाच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूण म्हणून श्री.नवसागर बोलत होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई गायकवाड यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले याच्या कार्याबाबत विचार व्यक्त केले.सामाजिक समता पर्व अंतर्गत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या प्रांगणात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी विविध संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते विजय तमनर,कांतीलाल जाडकर,संदीप उमप आदी उपस्थित होते.

‘सामाजिक समता पर्व अंतर्गत’ आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी यावेळी माहिती दिली. श्री.कातकडे यांनी आभार मानले.

समाज कल्याण विभागाच्या वतीने माळीवाडा येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी,समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे,जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी भागवत खरे,बार्टीचे दिलावर सयद,चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर तसेच विविध संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते, समाज कल्याण कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close