जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जयंती,पुण्यतिथी अभिवादन

कोपरगावात लोकमान्य टिळक,लोकशाहीर साठे जयंती साजरी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयात महान स्वातंत्रसेनानी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले आहे.

टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना “भारतीय असंतोषाचे जनक” म्हटले. त्यांना “लोकमान्य” ही पदवी देखील बहाल करण्यात आली, ज्याचा अर्थ “लोकांनी त्यांचा नेता म्हणून स्वीकार केला”.महात्मा गांधींनी त्यांना “आधुनिक भारताचा निर्माता” म्हटले.

तुकाराम भाऊराव साठे (१ ऑगस्ट १९२०-१८ जुलै,१९६९) हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक,लोककवी आणि लेखक होते.साठे हे मांग (दलित) समाजामध्ये जन्मलेले होते.त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे,आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करणारे भारतीय स्वतंत्र्य चळवळीचे पहिले नेते,शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते,तज्ञ वकील अशी ओळख असणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृतिदिन तसेच थोर समाज सुधारक,लोककवी, लेखक,शाहिरी व पोवाडे यातून समाज प्रबोधनाचे काम करणारे अण्णाभाऊ साठे यांची जयंती महाविद्यालयात साजरी करण्यात आली आहे.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांच्या हस्ते दोन्ही महान व्यक्तींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सदर प्रसंगी प्रो.विलास आवारी,डॉ.विजय ठाणगे,प्रो.बी.बी.भोसले,डॉ.बाबासाहेब गव्हाणे, डॉ.बी.एस. गायकवाड,डॉ.अभिजीत नाईकवाडे यांच्या समवेत बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close