जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जयंती,पुण्यतिथी अभिवादन

कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज  जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे व शहरप्रमुख कलविंदर दडियाल यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे.

कोपरगावात त्या निमित्ताने युवती सेनेच्या वतिने छत्रपती शिवाजी महाराज जंयती निमित्ताने स्त्री शक्ती जनजागृती रँलीचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स.१८७० साली शिवजयंती सुरू केली जी पहिली शिवजयंती होती.आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले.२०व्या शतकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील शिवजयंती साजरी केली होती ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली आहे कोपरगाव शहरातही नुकतीच शिवजंती साजरी करण्यात आली आहे.

दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.याप्रसंगी प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने तमाम भारतीयांना शुभेच्छा देऊन शहरातील धारणगांव रोड,पुणतांबा चौफुली निवारा,विठ्ठल नरहरी मंदिर त्याचप्रमाणे शिवसेनेच्या शाखेच्या विविध ठिकाणी भेटी देऊन अभिवादन करण्यात आले उपशहरप्रमुख अश्विनीताई होने यांनी शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने गड किल्लेचे प्रदर्शन शाळेत भरविले होते.लक्षवेधी गड किल्ले प्रदर्शन असल्याने गड किल्ल्यांची-माहिती आजच्या तरूणांच्या ज्ञानात भर पाडणारी असल्याची माहिती आहे.
त्याच प्रमाणे सध्याकाळी शिव व्याख्यते सुरज तुवर सर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले गड किल्ले प्रर्दशन मध्ये सहभागी स्पर्धकांना बक्षिस वितरणासह विविध उपक्रमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली आहे.
याप्रसंगी जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, शहर प्रमुख कलविंदर दडियाल ज्येष्ठ शिवसैनिक दिलिप आरगडे,विशाल झावरे,वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,कोपरगाव शिवसेना सचिव बाळासाहेब साळुंके,प्रवक्ते राहुल देशपांडे,उपशहरप्रमुख विकास शर्मा,किरण अंडांगळे,शेखर कोलते,योगेश उशिर,प्रफुल्ल शिंगाडे,सुनील कुंढारे,संघटक वैभव गिते,दिनेश भालेराव,राजु सोळसे,मधु पवार,मंगेश देशमुख,शैलेश वाघ,प्रवीण शेलार,अविनाश धोक्रट,अशोक पवार,शैलश वाघ,किरण खर्डे,सतिष खर्डे,विक्रांत खर्डे,भुषण वडांगळे,विक्रांत झावरे,विकास शर्मा,प्रवीण शिंदे,विजय शिंदे,सचिन मोरे,रविंद्र पवार,यांच्या सह शिवसेनेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close