जाहिरात-9423439946
जयंती,पुण्यतिथी अभिवादन

शेतकऱ्यांना साथ देणारा नेता हरपला-कोपरगावात हळहळ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

प्रा.डॉ.एन.डी.पाटलांनी गेल्या सत्तर वर्षांच्या सक्रीय सार्वजनिक आयुष्यात बरीच आंदोलनं केली होती.शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांना आस्था होती.त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधिमंडळात आणि रस्त्यावरही आवाज उठवला व आंदोलनं केली होती असे प्रतिपादन कर्मवीर कारखाण्याचे माजी उपाध्यक्ष एम.टी.रोहमारे यांनी केले आहे.

“प्रा.एन.डी.पाटलांनी जनआंदोलनं हे आपलं शस्त्र म्हणूनच कायम बाळगलं.रायगड जिल्ह्यातील विशेष आर्थिक क्षेत्राच्या विरोधातील आंदोलनात सर्वहारा जनआंदोलनाच्या सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्या पाठीशी ठामपणे राहिले.हा लढा यशस्वीही झाला आणि सरकारला हा सेझ गुंडाळावा लागला होता”-एम.टी.रोहमारे.माजी उपाध्यक्ष,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाना.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी सहकार मंत्री प्रा.डॉ.एन.दि पाटील यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या निधनाबद्दल कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील रयतच्या श्री.ग.र.औताडे विद्यालयात श्रद्धांजली सभा आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.

सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य काकासाहेब गवळी,पर्यवेक्षक भास्करराव बांगर,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख कमलाकर शिंदे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की,”१९८० साली शरद पवारांनी जळगावहून नागपूरपर्यंत काढलेल्या शेतकरी दिंडीत शरद पवार,राजारामबापू पाटील यांच्यासह खांद्याला खांदा लावून प्रा.एन.डी.पाटील सहभागी होते.विधि मंडळातर्फे २०२० साली जेव्हा महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या जन्म शताब्दी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,त्यात बोलताना पवार म्हणाले, जळगाव-नागपूर शेतकरी दिंडीत एकही दिवस विश्रांती न घेता,सलग चालत जाणारा माणूस म्हणजे एन.डी.पाटील होते असे कौतुक केले होते.व सार्थ होते असेही ते शेवटी म्हणाले आहे.

सदर प्रसंगी प्रास्तविक प्राचार्य काकासाहेब जावळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रमुख कमलाकर शिंदे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close