जयंती,पुण्यतिथी अभिवादन
पोहेगावात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्यागामुळेच वर्तमानात स्रिया उज्वल जीवनमान अनुभवत असल्याचे प्रतिपादन पोहेगाव येथील श्री.ग.र.औताडे विद्यालयाचे प्राचार्य काकासाहेब गवळी यांनी एका कार्यक्रमात केले आहे.
सावित्रीबाई जोतीराव फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते.त्यांची जयंती पोहेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी १८४८ मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरूवातीच्या शाळांपैकी एक होती.त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी १८४८ मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरूवातीच्या शाळांपैकी एक होती.त्यांची जयंती नुकतीच कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील श्री.ग.र.औताडे पाटील विद्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली आहे त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की,”क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका होऊन गेल्यामुळे आजही प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक अशी स्त्रियांची प्रगती दिसून येते. सावित्रीबाई फुले जर नसत्या तर आजही स्रिया या शिक्षणापासून वंचित राहिल्या असत्या सावित्रीबाई फुले होत्या म्हणून तर आजची स्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन लढताना दिसत आहे.सदर प्रसंगी विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती बनसोडे मॅडम यांनी आपल्या भाषणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा संपूर्ण जीवन पट उभा केला तर विद्यालयातील दहा मुलींनी सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेला होता. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री बांगर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.