जाहिरात-9423439946
जगावेगळा हरींनाम सप्ताह

साधनेने दैवीगुण तर पापाचरणाने पुण्यक्षय होतो-महंत रामगिरीजी महाराज

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

साधक साधनेतुन दैवी गुणांसह ऊर्जा प्राप्त करतो ती ऊर्जा म्हणजेच तेज.पुण्यकर्माने आपण तेज संचय करु शकतो.परंतु पाप कर्माने तेज नाहिसे होते,नाश होते.म्हणुन माणसाने जिवनात पापाचरण करु नये असे आवाहन सराला बेटांचे महंत रामगिरीजी महाराज यांनी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील एका कार्यक्रमात बोलताना उपस्थित भाविकांना केले आहे.

“जिवन असहाय्य व्हायला लागतं.त्यामुळे जगण्यापेक्षा मेलेले बरे असे त्यांना वाटु लागते.परंतु कुणीतरी व्यक्ती जवळचे मित्र,सज्जन भेटले तर मनातील विकार,उन्माद जावु शकतात आणि माणसाला जगण्याचे अंकुर फुटू शकतात”-महंत रामगिरीजी महाराज,श्री क्षेत्र कोकमठाण.

देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्री सद्गुरू गंगागीरीजी महाराज यांच्या,”शतकोत्तर अमृत महोत्सवी अखंड हरींनाम सप्ताह’ कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र कोकमठाण येथे आज नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते नुकताच संपन्न झाला होता.आज त्याचे किर्तनरूपी पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते.

सदर प्रसंगी मान्यवर लोकप्रतिनिधी,कार्यकर्ते,स्वयंसेवक,श्रद्धाळू,लाखो भाविक उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना त्यांनी श्रीमदभागवतातील आत्मदेवाचा पुत्र धुधुंकारीचा दृष्टांत दिला.त्यात कुकर्मा मुळे धुंधूकारीची अधोगती दर्शवली व त्याला पिशाच्च योनी प्राप्त झाल्याचे सांगितले होते.आत्मदेवाला संतती नसल्याने लोकांच्या टोमण्यांना कंटाळून आत्महत्या करायला निघतो.सामान्य लोक आत्महत्तेसाठी प्रवृत्त का होतात ? असा सवाल विचारून त्याचे मर्म विशद करताना ते म्हणाले की,”जिवन असहाय्य व्हायला लागतं.त्यामुळे जगण्यापेक्षा मेलेले बरे असे त्यांना वाटु लागते.परंतु कुणीतरी व्यक्ती जवळचे मित्र,सज्जन भेटले तर मनातील विकार,उन्माद जावु शकतात.आणि माणसाला जगण्याचे अंकुर फुटू शकतात.त्यावेळी त्यांनी धुंधूकारी बाबत बोलताना म्हटले आहे की,”वाटेत त्याला एक साधु भेटतात.याप्रमाणे आत्मदेवाला साधुचे दर्शन झाले.साधुला सर्व समजल्यावर साधु म्हणाले,”तु संसार वासनेचा त्याग कर,कर्माची गती गहन आहे,कशाला पुत्राची अपेक्षा करतो.ज्याला मुले आहेत ते तरी कुठे सुखी आहेत.त्यावर आत्मदेव म्हणतात,”देवा संसारी लोकांचे दु:ख तुम्हाला काय कळणार ? पुत्र पाहिजे.साधुला दया आली.प्रसाद दिला याबाबत भागवतात विस्तृत कथा आहे.ते फळ गायीला घातले त्यापासुन गोकर्ण झाला.आणि दुसरा धुधूंकारी झाला.धुधुंकाशी संबंध आल्याने धुधूंकारी जन्माला आला.धुधूंली म्हणजे अस्पष्ट अज्ञान ! आत्म्याचा अज्ञानाशी संपर्क परिणामस्वरूप धुंधूकारी पातकी जीव जन्माला आला.व्यसनाधिन झाला.व्यसने जडली.असे सागुन महंत रामगिरी महाराज म्हणाले, “संसार एक वेसन आहे.याचे शुध्दीकरण म्हणजे किर्तन,नामघोष आहे.सप्ताहात भगवंताचे भजन असते,उर्जा असते,या ठिकाणी आले तरी ती आपोआप प्राप्त होते.कुकर्मामुळे उर्जेचा नाश होतो. पांडव दूत खेळले,त्यामुळे कुकर्म घडले आणि उर्जा नष्ट झाली. म्हणुन त्यांना वनवास घडला. व वनवासातुन उर्जा प्राप्त झाली.

धुधूंकारीला सर्व व्यसने जडली.आत्मदेवाने विरोध केला.पण उपयोग झाला नाही.एक दिवस पुत्र नाही म्हणुन रडत होता आता पुत्र झाला म्हणुन रडतो.गोकर्णाने आत्मदेवाला उपदेश केला ! शरीर हे दु:खाचे भांडार आहे.वैराग्याचा स्विकार करा.हा उपदेश पटायला लागला.तेज धारण करण्याची क्षमता निर्माण व्हावी लागते.जो पर्यंत ती क्षमता निर्माण होत नाही.तो पर्यंत उपदेश सफल होत नाही.यावर महाराज म्हणाले,तेज धारण करण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती.खरोखर विचारी असेल तर वैराग्य प्राप्त होते.प्रपंचात सुख दु:खाचे चटके बसणे हा देहाचा स्वभावच आहे.संसारात होरपळता होरपळता हळू हळु शुध्दीकरण व्हायला लागते,आणि त्याला परमार्थ करायला लागतो. मग त्याला वाटायला लागते संसार हा दु:ख आहे.

आत्मदेवाने घराचा त्याग केला.धुधुंकारी व्यासनाधिन झाला.वाईट विचार पतनाला कारण ठरतात. वेश्या घरात आणल्या,चोर्‍या करु लागला.राजाकडे चोरी केली मौल्यावान दागिने आणले.राजा आपल्यालाही धरुन नेईन म्हणुन त्या वेश्यानी धुधूंकारीला मारुन टाकले.गोकर्ण तिर्थयात्रेवरुन आल्यावर त्याचा पिंडदानाचा विधी केला.पण मुक्ती मिळाली नाही.कारण पापच तेवढे केले होते. कुकर्मामुळे तेज नाहिसे झाले.भुत पिशाच्च योनीत तो गेला.स्वत: च्या कर्माच्या दोषामुळे नाश होतो.गोकर्णाने जीवरुपी धुधूंकारीला मुक्त करण्यासाठी श्रीमदभागवत वाचले असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close