जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गृह विभाग

काही विकृत प्रवृत्ती मोदींना विरोध म्हणून हिंसाचार घडवला-आरोप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
‘अग्निपथ’ योजनेच्या माध्यमातून तरुणांना देशसेवेची नवीन संधी असताना काही विकृत प्रवृत्ती मोदींना विरोध म्हणून हिंसाचार घडवत आहे.सैन्य दलाचे संदर्भात तरी राजकारण करू नये असे प्रतिपादन भाजपा सोशल मिडिया सेल चे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले आहे.

“देशातील राष्ट्रप्रेरीत तरूणांना देशसेवेची नवीन संधी उपलब्ध होणार आहे.देशातंर्गत दहशतवाद,सीमेवरील लष्करी कारवाया,नक्षलवादी कारवायां,परकीय शक्तींनी पुकारलेले छुपे युध्दे अशा अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी तरूणांना सिद्ध करण्याचा प्रयत्न या योजनेतून केला जाणार आहे.मात्र याला विरोध करण्यासाठी तरूणांचे माथी भडकवण्याचे काम काही राजकीय पक्ष करत आहेत”-भाऊसाहेब वाकचौरे,अध्यक्ष नगर जिल्हा मीडिया सेल भाजप.

श्री.वाकचौरे यांनी प्रसिद्धीस दिलेले पत्रकात म्हटले आहे की,”अग्निपथ योजनेवरून देशात सध्या बराच गदारोळ सुरू आहे.देशातील राष्ट्रप्रेरीत तरूणांना देशसेवेची नवीन संधी उपलब्ध होणार आहे.देशातंर्गत दहशतवाद,सीमेवरील लष्करी कारवाया,नक्षलवादी कारवायां,परकीय शक्तींनी पुकारलेले छुपे युध्दे अशा अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी तरूणांना सिद्ध करण्याचा प्रयत्न या योजनेतून केला जाणार आहे.मात्र याला विरोध करण्यासाठी तरूणांचे माथी भडकवण्याचे काम काही राजकीय पक्ष करत आहेत.ही महत्त्वकांक्षी योजना केवळ मोदी सरकारची योजना असल्याने विरोधक विरोध करण्यासाठी कोणत्याही थराला जात आहेत याचे हे उदाहरण आहे.या योजनेमुळे देशातील सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करणे शक्य होणार आहे.

सैनिक प्रशिक्षणांच्या महत्वकांक्षी नव्या माध्यमातुन भारताच्या संपुर्ण सुरक्षित सज्जतेमध्ये लोकांचे महत्त्वाचे योगदान हे घडवणारी ही योजना आहे.असा हा मोठा समूह तयार करण्याचे काम म्हणजे अग्निपथ.खरे म्हणजे परिवर्तन भारताच्या दिशेने टाकलेले हे मोठे पाऊल आहे.पण तरीसुद्धा केवळ ही मोदींजीं ही संधी उपलब्ध करून देत आहेत त्यासाठी विरोध केला जात आहे.

या योजनेमुळे सैन्यातील नौकरी बरोबर भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेले अतिरिक्त कौशल्याचे प्रशिक्षण त्यांना मिळणार आहे.त्याशिवाय या अग्निपथ योजनेत सहभागी होणाऱ्या तरूणांना कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी सुद्धा मदत होणार आहे.पण मोदी द्वेषाने पछाडल्यानंतर काहीच चांगले दिसत नाही. तेच नेमके याठिकाणी दिसत आहे.त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध,या योजने विरोधात विकृत प्रचार करून माथी भडकवण्याचे काम सुरू आहे.

चार वर्षानंतर या सेवेतून मुक्त होणाऱ्या तरूणांना तो काही कामच करू शकणार नाही, बेरोजगार राहणार असा प्रचार आमि आरोप करणे अत्यांत चुकीचे आहे.उलट त्या तरूणाला या चार वर्षात जी संधी आणि अनुभव मिळणार आहे त्याचा त्याला पुढच्या भविष्यासाठी अधिक उपयोग होणार आहे.अग्निवीरचा कालावधी जो तरूण पुर्ण करेल त्याला अकरा लाखा पर्यंतचे आर्थिक लाभ मिळणार आहे.या अर्थसाहय्यातून हा तरूण पुढे नवीन व्यवसाय सुरू करू शकतो अन्यथा अन्य गोष्टीसाठी सुद्धा मदत होईल.त्यामुळे या नव्या दमाच्या तरूणांचा संरक्षण क्षेत्रासाठी उपयोग करून घेता येईल,तरूणांतील देशसेवा करण्याची इच्छा सफळ होईल,राष्ट्रभक्ती वाढीस लागेल व रोजगार ही उपलब्ध होऊन कार्यक्षम तरूणवर्ग घडेल. तेव्हा केवळ मोदी द्वेषाने विरोधाचे राजकारण करणे हे दुर्दैवी आहे.

मोदी सरकारने संरक्षण दलांसाठी ‘अग्निपथ भरती योजने’ची घोषणा केली.अग्निपथ योजने अंतर्गत सैन्यदलांत ४वर्षांसाठी सेवेसाठी १७.६ ते २१ वयोगटातील तरुणांची भरती केली जाणार आहे. यावर्षी ४६ हजार युवकांना संधी मिळणार आहे. या भरतीला ‘Tour of Duty’ असे नाव देण्यात आले आहे.सैनिकांना ‘अग्निवीर’ संबोधले जाणार आहे. ४ वर्षांनंतर या योजनेंतर्गत भरती झालेल्या ८०% अग्निवीरांची सेवा समाप्त होणार.२५ टक्के अग्निवीरांना तिन्ही सैन्यदलात काम करण्याची संधी मिळणार.त्यांच्यामुळे देशाची सुरक्षा सशक्त होईल व देशातील तरुणांनी एकदा तरी पाहिलेले सैन्य भरतीचे स्वप्नही पूर्ण होईल.अग्निपथ योजनेमुळे रोजगाराच्या संधी वाढणार असून तरुणांना इकडून बाहेर पडल्यावर इतर क्षेत्रात जाण्यासाठीही चांगली संधी मिळणार आहे.जर अग्निवीराने सेवेच्या काळात प्राणांचे बलीदान दिले तर त्याच्या कुटुंबाला सरकारकडून १ कोटी रुपयांचे साहाय्य केले जाणार.या काळात अग्निवीराचा नैसर्गिक मृत्यू वा त्याला अपंगत्व आल्यास सरकारकडून ४८ लाख रुपयांचे साहाय्य दिले जाणार आहे.४ वर्षांच्या अग्निवीरांच्या सेवेमध्ये ६ महिने प्रशिक्षण कालावधी यात समाविष्ट आहे.अग्निवीरांना महिना ३०,४० हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. ४ वर्षांची सर्व्हिस संपली की ११.७१ लाख सेवा निधी देण्यात येणार,ज्यावर इन्कम-टॅक्स लागणार नाही.या ४ वर्षांच्या सेवेत जे अग्निवीरांना शिकवण्यात येईल,त्याला ‘स्किल’ मानले जाईल व तसे सर्टिफिकेट देण्यात येईल.

आज बिहार किंवा एकूणच उत्तर भारतात सैन्याच्या भरतीसाठी नव्याने येऊ घातलेल्या ‘अग्निपथ’ योजनेवरून हिंसाचाराचे जे तांडव सुरु झाले आहे,त्याने अनेकांची मती कुंठीत झाली आहे. योजनेच्या घोषणेनंतर चोवीस तास उलटायच्या संपूर्ण अग्निपथ योजनाच मागे घ्या अशी आंदोलकांची मागणी आहे.कृषी कायद्यांच्या बाबतीतही हीच मागणी होती.काय वाईट आहे हे सांगताच येत नाही.फक्त मोदींना विरोध हाच एक कलमी कार्यक्रम.त्यासाठी मग ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने देशात आंदोलने करायची.कोण आहेत यांचे नेते ? कोण आहेत यांचे सूत्रधार ? याचा शोध लागला पाहिजे असे मत वाकचौरे यांनी शेवटी व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close