क्रीडा विभाग
कुस्ती स्पर्धेत…या महाविद्यालयाचे लक्षवेधी यश
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील स्थानिक के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील ११ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी कु.तनिष्क सुनील कटारनवरे यांने शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी दिली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कुस्ती हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे.हा दोघांमध्ये खेळला जातो.डाव,चपळता,निर्णयक्षमता या खेळात महत्त्वाची असते.या खेळात अनेक डावपेच असतात.उदाहरणार्थ,कलाजंग,ढाक,मोळी,निकाल,आतील व बाहेरील टांग,एकेरी पट,दुहेरी पट,गदालोट,एकचाक,धोबीपछाड आदी.हा खेळ भारतात तसेच इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे.भारतातील कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते.कुस्तीचे ओलिंपिक सामने एका जाड सतरंजीवर खेळले जातात.राज्यात आणि देशात विविध वेळी आणि ठिकाणी या स्पर्धा सातत्याने सुरु असतात.आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण येथे दि.१४ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा नुकत्याच मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या आहे त्यात त्याने हे यश संपादन केले आहे.दरम्यान आता त्याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
तनिष्क ने कुस्ती स्पर्धेत मिळविलेल्या या यशाबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदिप रोहमारे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे,क्रीडा शिक्षक डॉ.सुनील कुटे,प्रा.मिलिंद कांबळे यांच्या हस्ते तनिष्कचा सत्कार करण्यात आला आहे.यावेळी महाविद्यालयातील प्राचार्य,प्राध्यापक,विद्यार्थीबहुसंख्येने उपस्थित होते.