जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगावात…या प्राण्यांचा उपद्रव वाढला,अनेक जखमी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात पिसाळलेल्या एका कुत्र्याने दोन मुलांसह एक महिला जाखमी केल्याने शहरात मोकाट प्राण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्याबाबत नगरपरिषदेस पावले उचलणे क्रमप्राप्त झाले असल्याचे मानले जात आहे.याबाबत नागरिकांनी पालिकेच्या या कारभाराबाबत मोठी नाराजी व्यक्त केली आहे.

“कोपरगाव शहरात मोठया प्रमाणावर मोकाट प्राणी वाढले असून कोपरगाव शहर हे कुत्र्यांना नंदनवन ठरले आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहे.मात्र पालिकेकडून दुर्लक्ष होत आहे.आता हि कारवाई करणे गरजेचे बनले आहे.सदर प्रश्न तातडीने नगरपालिका प्रशासनाने कारवाई करुन सोडवावा”-मंगेश पाटील,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगावात उघड्यावर होणारी मांस विक्री अन् कचराकुंड्यांतील शिळ्या अन्नावर पोसणार्‍या मोकाट कुत्र्यांच्या शहर आणि परिसरात टोळ्या तयार झाल्या आहेत.गुंडांच्या टोळ्यांना लाजवतील अशा या टोळ्या असून रस्त्यावरून ये-जा करणार्‍यांचा हे कुत्रे थेट पाठलाग करतात.यामुळे लहान मुले,महिला,विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदारांना दररोज जीव मुठीत घेऊन बाहेर पडावे लागत आहे.‘आमच्या भागातील कुत्रे पकडा’ अशा तक्रारी कोपरगाव पालिका प्रशासनाला वारंवार प्राप्त होतात.मात्र पालिकेकडून प्रत्यक्ष कारवाई होत नसल्यामुळे कुत्र्यांचा उच्छाद वाढतच चालला आहे.अशीच घटना नुकतीच उघड झाली असून या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ठोंबरे वाड्यानजीक आर्वी रोहन ठोंबरे,अवणी नितीन मुसंडी आदी दोन लहानग्यांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे.या शिवाय निशा सुनील सोनार या कुत्र्यानी जोरदार हल्ला चढवला असून त्यामुळे शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पूर्वीही ‘न्यूजसेवा न्यूज पोर्टल’ने व आमच्या प्रतिनिधीने मोकाट प्राण्याचा प्रश्न ऐरणीवर आणला होता.व सदरचा प्रश्न हा कोपरगावात गोवंशाची होत असलेली अवैध कत्तल कारणीभूत असल्याने नमूद केले होते.सदरचे विनापयोगी मांस हे खंदक नाल्यात अंधार पडण्याच्या सुमारास काही नागरिक दुचाकीवर येऊन ते फेकुन निघून जातात.त्यामुळे मोकाट कुत्र्यांना आयतेच खाद्य मिळत असल्याने नजीकच्या गावातील कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी शहरात फिरताना दिसत आहे.पूर्वी शेख हे आरोग्य निरीक्षक असताना या कुत्र्यांचा बंदोबस्त बऱ्यापैकी केला होता.त्यानंतर मात्र त्यावर अशी ठोक कारवाई झाली नाही.त्यामुळे कोपरगाव शहर हे कुत्र्यांना नंदनवन ठरले आहे.त्यामुळे आता हि कारवाई करणे गरजेचे बनले आहे.सदर प्रश्नी तातडीने नगरपालिका प्रशासनाने कारवाई कारवाई करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close