जाहिरात-9423439946
दळणवळण

समृद्धी महामार्गाने औद्योगीकरणास वेग येताना शेतकऱ्यांना सुद्धा समृद्धी-मुख्यमंत्री

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाने औद्योगीकरणास वेग येणार असताना या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा समृद्धी आणली असा दावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.

   सदर प्रसंगी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाले असतांना त्यास पाणी सोडण्याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपल्या सोयीप्रमाणे पिंडीला कावळा शिवत नाही तशी बगल दिली आहे.त्या बाबत निळवंडे लाभक्षेत्रातील १८२ दुष्काळी शेतकऱ्यांत मोठा संतोष निर्माण झाला आहे.मात्र भाजपच्या काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी मात्र सदर प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत सोयीस्कर पोहचवला असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले.उद्घाटन केलेला मार्ग ५२० किमी लांबीचा असून तो नागपूर ते शिर्डीला जोडतो.शिर्डीला मुंबईशी जोडणारा भरवीर पर्यंतचा ८० कि.मी.चा उर्वरित कॉरिडॉर आता पूर्ण झाला असून त्याचे उदघाटन आज दुपारी ३.३० वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी राज्याचे प्रधान सचिव विजय सिंग,शिर्डीचे खा.सदाशिव लोखंडे,डॉ.सुजय विखे,खा.हेमंत गोडसे,व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार,उपव्यवस्थापक अनिलकुमार गायकवाड,आ.राम शिंदे,आ.मोनिका राजळे,आ.किशोर दराडेमाजी आ.बाळासाहेब मुरकुटे,आ.रमेश बोरणारे,जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले,भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर,विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,सरव्यवस्थापक कैलास जाधव,आदी मान्यवरांसह बहुसंख्य नागरिक शेतकरी उपस्थित होते.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”बंद खोलीत बसून काम करणारे हे सरकार नाही असा उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख करून त्यांनी टीका केली व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले आहे.समृद्धी करण्यास अनेकांनी विरोध केला पण त्याच लोकांनी आमच्याशी संपर्क करून संमती दिली.शेतकऱ्यांना विश्वासात घेतले व व काही शेतकऱ्यांना अवघ्या तीन तासात त्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले अशी उदाहरणे समोर निर्माण केल्याने विकासाचा मार्ग मोकळा केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठबळ दिले असल्याचे सांगून कौतुक केले आहे.या महामार्गाने शेतकऱ्यांना सुद्धा समृद्धी आणली असा दावा केला आहे.त्यावेळी मुंबईच्या रस्त्यांची माहिती दिली आहे.प्रवाशांचा वेळ वाचून जोखीम करण्याचे काम हे सरकार करत आहे.या प्रकल्पाअंतर्गत कृषी विकास केंद्रे विकसित करण्यात येणार असल्याचे सांगून आगामी काळात शिर्डी विमानतळाचे नूतन टर्मिनसचे भूमिपूजन लवकरच करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी शेवटी जाहीर केले आहे.


   सदर प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की,”आगामी सहा महिन्यांत तिसरा टप्पा सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व एकनाथ शिंदे यांचे ऋण व्यक्त करून हे काही जणांना अशक्य वाटत होते.पण ते वास्तवात आले आहे.मला रस्ता बनवण्याचा छंद असल्याचे सांगून आमदारांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली माध्यमांना विश्वासात घेतले व त्यामुळे हे शक्य झाले आहे.उद्धव ठाकरेंना त्यांनी टोला लगावला व त्यांच्यावर टीका केली आहे.विरोध करत असताना काही गावांनी राजीनामे देऊन आपली भूसंपादनाची संमती देऊन प्रक्रिया राबवली आहे.त्यात अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली त्यांचे व शेतकऱ्यांचे असल्याचे कौतूकोदगार व्यक्त केले आहे.कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावचे खास कौतुक केले आहे.त्याला उपस्थित शेतकऱ्यांनी दाद दिली आहे.औद्योगिक क्षेत्र नागपूर पर्यंत विस्तारणार आहे.या मार्गावर अपघात होत असले तरी त्यासाठी प्रतिबंध करण्याचे प्रयत्न होत आहे त्यासाठी वाहन चालकांनी व प्रवाशांनी वेग मर्यादित ठेऊन अपघात कमी होतील.हा प्रयोग जागतिक पातळीवर प्रेरणादायी ठरणार आहे.नागपूर-गोवा सुरत-चेन्नई आदी मार्ग त्याची उदाहरणे निर्माण असल्याचे सांगितले आहे.व शिंदे सरकार हे काम करणारे असल्याचे सांगितले आहे.


   दरम्यान सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समिती डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाले असल्याने व जिल्ह्यातील मंत्री शुक्राचार्यांची भूमिका वठवत असल्याने सदर पाणी कालव्यास सोडण्यावरून या कार्यक्रमात काही गोंधळ तर करणार नाही ना ?  या बाबत जिल्हा पोलीस यंत्रणा सतर्क असलेली दिसून आली असून त्यांनी वारंवार समितीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी  कोठे आहे आणि काय करत आहेत याबाबत पाठपुरावा करत असल्याचे दिसून आले आहे.

  
सदर प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी बोलताना म्हणाले की,”या महामार्गापुढे मोठी आव्हाने होती ती पार केली आहे.त्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे आव्हान होते.त्यावेळी त्यांनी शिर्डी विमानतळासाठी खूप अडचणी होत्या त्या आपण सोडवल्या अशी बढाई मारण्यास ते विसरले नाही.जनतेची समृद्धी होणार असल्याचा दावा केला आहे.मात्र सदर प्रसंगी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाले असतांना त्यास पाणी सोडण्याबाबत मंत्री विखे यांनी आपल्या सोयीप्रमाणे पिंडीला
कावळा शिवत नाही तशी बगल दिली आहे.त्या बाबत निळवंडे लाभक्षेत्रातील १८२ दुष्काळी शेतकऱ्यांत मोठा संतोष निर्माण झाला आहे.

   त्या बाबत निळवंडे लाभक्षेत्रातील १८२ दुष्काळी शेतकऱ्यांत मोठा संतोष निर्माण झाला आहे.मात्र भाजपच्या काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी मात्र निळवंडे कालवा कृती समितीच्या मागणी नुसार सदर प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत सोयीस्कर पोहचवला असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

   दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्तविक राधेश्याम मोपलवार यांनी केले त्यावेळी या मार्गाने भूसंपादन बागायती भागातून केले व त्यासाठी जवळपास ४५० विविध शासन आदेश काढले होते.इगतपुरीच्या पुढील कामास मोठे आव्हान आहेत तरी ते काम आगामी काळात लवकर पूर्ण होईल असे सांगून त्यांनी सुरत चेन्नई हा मार्ग शिर्डीपासून जात असल्याने आगामी काळात या भागात महापालिका स्थापन होईल अशी स्थिती येणार आहे.१८ पैकी ९ नवनगराचे भुसंपादन झाले आहे.व पुढील ६ महिन्यात ती आकाराला येतील असे सांगितले आहे.

   प्रारंभी मुख्यमंत्री शिंदे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला तर त्या नंतर उपस्थितांनाचा सत्कार करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी केले तर उपस्थितांचें आभार अनिल गायकवाड यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close