कोपरगाव शहर वृत्त
जैन मुनींचे कोपरगावात…या नेत्याने केले स्वागत

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात तब्बल पाच वर्षानंतर संत शिरोमणी प.पु.१०८ आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे परम शिष्य असलेल्या जैन मुनींचे कोपरगावात आगमन झाले असून त्यांचे यावेळी कोपरगाव विधानसभा मत्सर संघाचे आ.आशुतोष काळे यांनी त्यांचे कोपरगावकरांच्या वतीने स्वागत केले आहे.
“जैन मुनींचे चरण स्पर्श कोपरगावच्या भूमीला होत आहे हे कोपरगावकरांचे भाग्य आहे.कोपरगावकर नेहमीच सर्व धार्मिक कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.त्यामुळे यावर्षी होणारा चातुर्मास कार्यक्रम कोपरगाव मध्ये घेवून कोपरगावकरांना सेवा करण्याची संधी द्यावी”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
आचार्य श्री विद्यासागर महाराज यांचे परम शिष्य संत श्री अक्षयसागर महाराज,श्री नेमीसागर महाराज,श्री शैलसागर महाराज,श्री अचलसागर महाराज व श्री उपशमसागर महाराज यांचे बुधवार रोजी कोपरगावनगरीत आगमन झाले आहे.यावेळी असंख्य जैन समाज बांधव व जैन मुनी समवेत आ.काळे यांनी टाकळी नाका ते कोपरगाव शहरातील महावीर भवन पर्यंत पायी प्रवास केला आहे.सर्व जैन मुनींचे महावीर भवन या ठिकाणी आ.काळे यांनी आरती करून पूजन केले आहे.
सदर प्रसंगी आ.काळे म्हणाले की,”जैन मुनींचे चरण स्पर्श कोपरगावच्या भूमीला होत आहे हे कोपरगावकरांचे भाग्य आहे.कोपरगावकर नेहमीच सर्व धार्मिक कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.त्यामुळे यावर्षी होणारा चातुर्मास कार्यक्रम कोपरगाव मध्ये घेवून कोपरगावकरांना सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती कोपरगावकरांच्या वतीने व समस्त जैन समाजाच्या वतीने त्यांनी जैन मुनींकडे केली आहे.
यावेळी समाजाचे पंच अशोक पापडीवाल,महावीर दगडे तसेच सर्व विश्वस्त,अजित लोहाडे,कैलास ठोळे,दिलीप अजमेरे,नितीन कासलीवाल,अजित काले,सी.डी.ठोळे,सचिन ठोळे,राजाभाऊ अजमेरे,सुनील बोरा,राजाभाऊ फुलफगर,सचिन अजमेरे,अतुल काले,महावीर काले,परेश पांडे,विशाल ठोळे,योगेश गंगवाल,प्रीतम गंगवाल,नीरज कासलीवाल,सुयोग ढोले,अशोक गंगवाल,राजाभाऊ गंगवाल,गोकुळ गंगवाल,पियुष गंगवाल,सुमित लोहाडे,संतोष गंगवाल,आनंद काले,डॉ.मयुर गंगवाल,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,रमेश गवळी,राजेंद्र वाकचौरे,कलविंदर डडीयाल,अशोक आव्हाटे,राजेंद्र खैरनार,शैलेश साबळे,ऋषीकेश खैरनार,अक्षय आंग्रे,रण बागुल,राजेंद्र आभाळे,विकी जोशी,रामदास केकाण,तेजस साबळे आदींसह जैन बांधव उपस्थित होते.