जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

शहरातील रस्त्यांची डागडुजी करून स्वच्छता करा-कोपरगावात मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात दरवर्षी गुढीपाडवा व रामनवमी सण मोठ्या उत्साहात साजरा केला असतो त्या निमित्ताने पालखी सोहळा व दुचाकी फेरी काढण्यात येते.त्यामुळे हे उत्सव साजरे करतांना कुठेही रस्त्यांची अडचण येवू नये यासाठी रस्त्यांची डागडुजी करून स्वच्छता करा अशी मागणी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष धनंजय कहार यांनी नुकतीच कोपरगाव नगरपरिषदेकडे केली आहे.

संकल्पित छायाचित्र.

“ज्या रस्त्यांचे काम सुरु आहेत त्या रस्त्यांची कामे तातडीने संबंधित ठेकेदाराकडून पूर्ण करून घ्यावीत.गुढीपाडवा व रामनवमी सणाच्या दिवशी सर्व पालखी मार्गाची स्वच्छता करावी फेरीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला भगिनींना व कोपरगाव वरून शिर्डीला जाणाऱ्या गाव पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या साईभक्तांना तसेच कहार समाजाच्या मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही”-धनंजय कहार,उपाध्यक्ष,कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस.

मागील दोन वर्ष कोरोना महामारीच्या सावटाखाली कोपरगाव शहरातील नागरिकांनी गुढीपाडवा व रामनवमी सण साजरे केले. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नसून सण साजरे केंयासाठी कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.दरवर्षी गुढीपाडव्याला महिलांची निघणारी दुचाकी फेरी व रामनवमी उत्सवाच्या वेळी प्रभाग क्रमांक ५ मधून कोपरगाव ते शिर्डीला जाणारी गाव पालखी व कहार समाजाची मिरवणूकीत सहभागी नागरिकांना कोपरगाव शहरातील खराब रस्त्यांचा व रस्त्यांच्या सुरु असलेल्या कामाचा त्रास होणार नाही याची काळजी कोपरगाव नगरपरिषदेने घ्यावी.

ज्या पालखी मार्गावर रस्ते खराब आहेत त्या ठिकाणी डागडुजी करावी.ज्या रस्त्यांचे काम सुरु आहेत त्या रस्त्यांची कामे तातडीने संबंधित ठेकेदाराकडून पूर्ण करून घ्यावीत.गुढीपाडवा व रामनवमी सणाच्या दिवशी सर्व पालखी मार्गाची स्वच्छता करावी फेरीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला भगिनींना व कोपरगाव वरून शिर्डीला जाणाऱ्या गाव पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या साईभक्तांना तसेच कहार समाजाच्या मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता कोपरगाव नगरपरिषदेने घ्यावी असे धनंजय कहर यांनी शेवटी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close