जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगावातील अवाजवी घरपट्टी रद्द करा-धुमाळ यांचेसह नागरिकांची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत नुकत्याच जरी करण्यात आलेल्या कारच्या अवाजवी नोटिसा रद्द कराव्या अशी मागणी कोपरगाव जेष्ठ कर्यकर्ते उमेश धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतीच मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना भेटून केली आहे.दरम्यान धारणगाव रस्त्याचे निकृष्ठ काम दुरुस्त करून सुरु करावे अशी मागणीही त्यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

“कोपरगाव शहरात अत्यंत महत्वाचा गणला गेलेला धारण गाव रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून सुरु आहे.मात्र ते काम सुरु असताना मागे लगेच खड्डे पडत आहे.त्यामुळे या कामाच्या दर्जावर प्रश्न चिन्ह लागले आहे.यापूर्वी गावातील ठेकेदाराने हे काम सुरु केले होते.मात्र ते पूर्ण न करताच उखडले होते.आताही अशीच स्थिती आहे.त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी तोडगा काढावा वड दर्जेदार काम करणाऱ्या ठेकेदाराकडून ते पूर्ण करून घ्यावे”-उमेश धुमाळ,जेष्ठ कार्यकर्ते कोपरगाव.

कोपरगाव शहर झपाट्याने वाढणारे शहर म्हणुन ओळखले जाते.शिर्डी नजीक असल्याने या शहरात जागेचे दर वाजवी असल्याने शिर्डी आणि परिसरात नोकरी आणि अन्य व्यवसाय करणाऱ्या नागरिकांची या शहरात जागेची मागणी वाढत चालली आहे.त्यामुळे शहराची भौगोलिक आकारमान मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे.

कोपरगाव नगरपरिषदेने साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाची निविदा काढून अनेक महिने उलटूनही त्यावर कार्यवाही केलेली नाही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे व त्यावर खुलासा मागितला आहे.यावर पालिका काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

मात्र कोपरगाव नारपरिषदेने नुकत्याच महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम १९६५ चे कलम ११९(१)(२) अन्वये मालमत्ता कराच्या वाढीव दराने नोटिसा काढल्या आहेत.त्यात सन-२०२२-२३ ते २०२६-२७ असा कालावधी दर्शवला आहे.करयोग्य क्षेत्रफळ,करयोग्य मूल्य,संकलित कर,विशेष शिक्षण कर,अग्निशामक कर,शिक्षण कर,रोजगार हमी कर,वृक्ष कर,असे अवाजवी कर लावल्याचा नागरिकांचा आरोप आहे.त्या नोटीसीत नावात काही बदल,चूक,कोणतीही हरकत असल्यास पालिका मुख्याधिकारी यांना लेखी स्वरूपात कळविण्यास सांगितले आहे.व त्यासाठी अखेरची मुदत ३ ऑक्टोबर २०२२ अशी दिली आहे.त्यामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोना साथीने दोन वर्ष नागरिकांचे कंबरडे आधीच मोडले असतांना पालिकेने हा तुघलकी निर्णय घेतला आहे तो नागरिकांना पचनी पडलेला नाही.त्यामुळे आधीच निष्ठावान भाजप व राष्ट्रवादीने आधीच आवाज उठवला असताना आज सकाळी उमेश धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज निवेदन देऊन मुख्याधिकाऱ्यांना पेचात गवसवले आहे.

दरम्यान त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटलं आहे की,”कोपरगाव शहरात अत्यंत महत्वाचा गणला गेलेला धारण गाव रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून सुरु आहे.मात्र ते काम सुरु असताना मागे लगेच खड्डे पडत आहे.त्यामुळे या कामाच्या दर्जावर प्रश्न चिन्ह लागले आहे.यापूर्वी गावातील ठेकेदाराने हे काम सुरु केले होते.मात्र ते पूर्ण न करताच उखडले होते.आताही अशीच स्थिती आहे.त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी तोडगा काढावा वड दर्जेदार काम करणाऱ्या ठेकेदाराकडून ते पूर्ण करून घ्यावे.

दरम्यान त्यांनी आपल्या निवेदनात इंदिरा पथ रस्त्याचे कामाकडे लक्ष वेधले आहे.त्यात त्यांनी रस्त्यावरील काही झाडे काढले आहे मात्र अद्याप या रस्त्यावरील महावितरण कंपनीचे रस्त्यात आलेले पोल काढलेले नाही अशी तक्रार केली आहे.

कोपरगाव नगरपरिषदेने साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाची निविदा काढून अनेक महिने उलटूनही त्यावर कार्यवाही केलेली नाही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे व त्यावर खुलासा मागितला आहे.यावर पालिका काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

सदर निवेदनावर अड्.बाळासाहेब देवकर,समीर हिंगमीरे,संतोष सुपेकर,संतोष मोरे,मधू पवार,प्रशांत चिमणपुरे,शिवनाथ तिपायले,मच्छीन्द्र सोनवणे आदींसह वीस कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close