जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

साठवण तलावाच्या कामाला गती द्या-…या नेत्याच्या सूचना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील नागरिकांना लवकरात लवकर नियमित स्वच्छ पाणी मिळावे यासाठी ५ नंबर साठवण तलावाच्या कामाला गती द्या अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

दरम्यान या कामांचा शुभारंभ किती वेळा झाला आणि किती वेळा त्याचे कामे चालू झाली याचा हिशेब लागत नसल्याची शहरातील नागरिकांची प्रतिक्रिया उमटली आहे.याबाबत निवडणूक पाहून केवळ उदघाटने करणे नेत्यांनी सोडून द्यावे अशी मागणी नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींसोबत बोलताना केली आहे.

१३१.२४ कोटी रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या साठवण तलाव क्र. ५ च्या पावसाळयानंतर सुरू करण्यात आलेल्या कामाची नुकतीच आ.काळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून त्यांनी साठवण तलावाच्या सुरू असलेल्या कामाची महिती घेतली.
यावेळी ते म्हणाले की,५ नंबर साठवण तलावासाठी मंजूर करून आणलेल्या १३१.२४ कोटी निधितील समावेश असलेल्या इतर कामांना प्रारंभ करण्यात आला आहे.मात्र कामाला गती कमी आहे त्यामुळे साठवण तलावाच्या पुढील कामाला गती देण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे.अडचणी आल्यास माझ्याशी संपर्क करा मात्र लवकरात लवकर मुदतीच्या आत ५ नं.साठवण तलावाचे काम पूर्ण कसे होईल यासाठी सामूहिक प्रयत्न करून साठवण तलावाच्या कामाला गती द्या अशा सूचना ना.आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या आहे.

यावेळी तहसीलदार विजय बोरुडे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,नगरपरिषद अभियंता सुनील ताजणे,मानवसेवा कन्स्ट्रक्शनचे विवेक पाटील,पाटबंधारे विभागाचे मिसाळ,लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे महेश मुंगेरीया,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,शहराध्यक्ष सुनील गंगूले,शहर कार्याध्यक्ष संतोष चवंडके,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,रमेश गवळी,कृष्णा आढाव,अजीज शेख,फकीर कुरेशी,दिनकर खरे,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close