जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगावातील…या उपनगरातील विकास कामे सुरु करा-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीत असलेले खडकी,समतानगर या उपनगरात मंजूर असलेले सुमारे ०१ कोटी २८ लाख १९ हजार ८४१ रुपयांची कामे त्वरित सुरु करा अशी महत्वपूर्ण मागणी कोपरगाव नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका श्रीमती ताराबाई जपे,संजय पवार यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचेकडे केली आहे.

“कोपरगाव नगरपरिषदेने समता नगर व खडकी उपनगरातील ०१ कोटी २८ लाख १९ हजार ८४१ रुपयांची विकास कामे सत्वर सुरु करावी अन्यथा आगामी ऑगष्ट क्रांती दिली म्हणजे ०९ ऑगष्ट रोजी आपण दोन्ही नगरसेवक अमर उपोषणास बसणार आहे”ताराबाई जपे व संजय पवार,माजी नगरसेवक,कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील समता नगर व खडकी हि उपनगरे येत असून शहरात येण्यासाठी त्यांना एकप्रमुख रस्ता आहे.मात्र तो अत्यंत नादुरुस्त झाला आहे.या खेरीज याच भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्तीतील विविध कांमासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ई-निविदा काढल्या आहेत.
त्यात प्रभाग क्रं.एक मधील जाधव घर ते नाईकवाडे घर खडीकरण करणे अंदाजपत्रकीय रक्कम २७ लाख ८१ हजार ५००,त्याच प्रभागात घुमरे घर ते संचेती घर ते राजू मोरे घर या रस्त्याचे खडीकरण करून कॉंक्रिटीकरण करणे अंदाजपत्रकीय रक्कम-२७ लाख ८१ हजार ५००,या शिवाय महाजन गोठा ते गरकल घरापर्यंत रस्त्याचे खडीकरण करून काँक्रिटीकरण करणे अंदाजपत्रकीय रक्कम-५८ लाख ०३ हजार ५००,याशिवाय नाईक वाडे घर ते चरापर्यंत भुयारी गटार बांधकाम करणे अंदाजपत्रकीय रक्कम ०९ लाख ७० हजार १००,या शिवाय खडकी भागातील गणपती मंदिर आणि शिवाजी महाराज उद्यान परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे या साठी अंदाजपत्रकीय रक्कम ०४ लाख ८३ हजार ०४१ असा एकूण ०१ कोटी २८ लाख १९ हजार ८४१ रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे.मात्र सदर कामे सुरु न झाल्याने नारिकांना व विद्यार्थ्यांना पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा व छोट्या मोठ्या अपघातांचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेने सदरची कामे सत्वर सुरु करावी अन्यथा आगामी ऑगष्ट क्रांती दिली म्हणजे ०९ ऑगष्ट रोजी आपण दोन्ही नगरसेवक अमर उपोषणास बसणार आहे असा इशाराही शेवटी ताराबाई जपे व संजय पवार यांनी शेवटी दिला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close