जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

मोकाट जनावरांचा सुळसुळाट,कोपरगावात अपघाताची शक्यता

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून यातून अनेक अपघात होत असून नगरपरिषदेने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे याची एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

संकल्पित छायाचित्र.

संजयनगर परिसरात मोकाट वासरे रस्त्यावर आढळत असून या ठिकाणी अशी वासरे आढळली की त्या परिसरात पुन्हा गोवंश हत्या सुरु झाल्याचे सुतोवाच आपोआप होत असते.चार वर्षांपूर्वी तर भर शिवरात्रीच्या दिवशी जिल्हा मुख्यालयातून गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी येऊन त्यांनी धाड टाकून शहरातील पोलिस व नगरपरिषदेचे पितळ उघड पाडले होते.हे सर्व त्यांच्या नाकाच्याखाली टिच्चून सुरु होते हे विशेष !

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,”कोपरगाव शहरातील अनेक रस्त्यांवर गायी फिरत असतांना आढळतात.दहा-वीसच्या समूहाने फिरणाऱ्या हे प्राणी अनेकदा रस्त्याच्या मध्यभागी बसलेले असतात.त्यामुळे वाहतुकीला-रहदारीला मोठा अडथळा येण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात.अशातच एखादी गाय उधळली तर अनेक जनावरे सैरावैरा पळायला लागतात व त्यातूनच अनेकदा अपघातही घडत असतात.यात अनेक नागरिक जायबंदी झालेले आहेत.या खेरीज शहरात मोकाट कुत्री तर प्रत्येक गल्लीत आढळत असून ते टोळीने सैरावैरा फिरताना दिसत असून समोरून कोणते वाहन येते की माणूस येतो याचे त्यांना भान नसते परिणाम स्वरूप अनेक अपघात होत असून त्यातून अनेकांना आपल्या जीवाची किंमत चूकवावी लागत आहे.

कधीकधी याच गायी रस्त्यावरील कचरा,प्लास्टिक कॅरी बॅग खाऊन आजारी पडून त्यांचा जीव धोक्यात येतो.वाहनांची धडक बसून गायी-वासरे जखमी होतात.कधी कधी रात्रीच्या वेळी पाळत ठेवून गायी चोरून नेण्याचेही वादग्रस्त प्रकार घडलेले आहेत.संजयनगर परिसरात मोकाट वासरे रस्त्यावर आढळत असून या ठिकाणी अशी वासरे आढळली की त्या परिसरात पुन्हा गोवंश हत्या सुरु झाल्याचे सुतोवाच आपोआप होत असते.चार वर्षांपूर्वी तर भर शिवरात्रीच्या दिवशी जिल्हा मुख्यालयातून गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी येऊन त्यांनी धाड टाकून शहरातील पोलिस व नगरपरिषदेचे पितळ उघड पाडले होते.हे सर्व त्यांच्या नाकाच्याखाली टिच्चून सुरु होते हे विशेष !
नगरपरिषदेने याआधी अशा फिरणाऱ्या गायी पकडून गो शाळेतही नेऊन ठेवल्या,दंडही केला.तरीही गायींचे मालक गायी शहरात फ़िरायला सोडून देतात हे योग्य नाही.अनेकांच्या जीवावर बेतणारे आहे.तरी अशा गायींच्या मालकांना नम्र आवाहन आहे,त्यांनी आपापल्या गायी आपल्या घराजवळ व्यवस्थित बांधून ठेवून त्यांची काळजी घ्यावी.एकीकडे गायीला पवित्र गो-माता म्हणायचे व तरीही निष्काळजीपणा करून बेजबाबदारपणे गायींचा व नागरिकांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही असे आवाहन माजी नगराध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close