जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी )

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व नवक्रांती महिला अकॅडमीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रविवार दि.०९ मार्च रोजी महिलांसाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णाई मंगल कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी दिली आहे.

“दि.०९ रोजी कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत महिलांचा आवडीचा दागिना असलेल्या नथीचे महिला व मुलींसाठी मोफत प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे”- चैताली काळे,कोपरगाव.

‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ हा दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जाणारा एक सुट्टीचा दिवस आहे.हा दिवस लिंग समानता,पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो.महिलांच्या हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो.त्याचे कोपरगाव येथे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व नवक्रांती महिला अकॅडमीच्या वतीने आयोजन केले आहे.या निमित्ताने यामध्ये बचत गटांच्या महिलांना आर्थिक द्रुष्ट्या सक्षम करण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणारा गोदाकाठ महोत्सव तसेच स्त्री शक्तीचा जागर आणि गौरव करण्यासाठी शारदीय नवरात्र उत्सव,दिवाळी हाट,विविध घरगुती व्यवसायांचे प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविले जात आहे.

त्याप्रमाणेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रविवार दि.०९ रोजी कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत महिलांचा आवडीचा दागिना असलेल्या नथीचे महिला व मुलींसाठी मोफत प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे.नीलम गावित्रे या महिलांना याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.महाराष्ट्रात मोत्याची नथ ही स्त्रियांचे सौभाग्यचिन्ह मानले जाते त्यामुळे विवाह सोहळा तसेच विविध धार्मिक कार्यक्रम प्रसंगी महिलांना नथ वापरण्याची मोठी हौस असते.नथीच्या अनेक डिझाईन्स असून या डिझाईन प्रशिक्षण घेवून महिला सहजपणे या नथी तयार करू शकतात त्यासाठी महिला व मुलींसाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संचालिका चैताली काळे यांनी सांगितले आहे.तसेच ‘चला देश घडवूया बालविवाह थांबवूया’ या सामाजिक विषयावर सामजिक कार्यकर्ते तथा शिर्डीच्या साईनाथ रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक गावित्रे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यां प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे,जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close